भुमरेंना २५ वर्ष आमदार अन् आता मंत्री असून जिल्ह्याला जोडणारा रस्ता करता आला नाही..

औरंगाबाद-पैठण रस्ता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील असूनही, रस्त्यांवरील खड्डे आणि चौपदरीकरणाचा मुद्दा कायम आहे. (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve-Minister Bhumre News
Opposition Leader Ambadas Danve-Minister Bhumre NewsSarkarnama

औरंगाबाद : पैठणचे आमदा संदीपान भुमरे हे २०-२५ वर्ष आमदार अन् दोनवेळा मंत्री झाले. पण त्यांना आपल्या मतदारसंघातील जिल्ह्याला जोडणारा रस्ता, त्याचे चौपदरीकरण करता आले नाही, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे. (Paithan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १२ सप्टेंबर रोजी पैठणला येत आहेत. (Shivsena) या पार्श्वभूमीवर दानवे यांनी आपल्या फेसबुकवरून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा फोटो शेअर करत मंत्री भुमरे यांना चिमटा काढला आहे.

दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोकांना मिरची लागेल अशा पोस्ट सोड असा कार्यकर्त्याला सल्ला देणारे मंत्री संदिपान भुमरे यांची मागे ऑडीओ क्लिप ऐकली. (Marathwada) जर आपण २०-२५ वर्ष आमदार नंतर मंत्री असून तालूका - जिल्हाला जोडणारा महत्वाच्या रस्त्याचे तुम्हाला साधे चौपदरीकरण करता आले नाही ही किती शोकांतीका आहे?

आज जर तुम्ही काम केले असते तर वायफळ सल्ले मंत्री, आमदार असतांना देण्याची गरज पडली नसती. काही दिवसांपूर्वी चीनमधील एका कंपनीचे पथक गुंतवणुकीसाठी औरंगाबादमध्ये आले होते. हे पथक बिडकीन येथे जागा पाहण्यासाठी पैठण रस्त्यावरून बिडकीन निघाले होते. पण रस्त्यातली वाहतुकची कोंडी, रस्त्याची अवस्था पाहून जमीन न पाहताच बिडकीन येण्यापूर्वीच त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद -पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत आहे. या कामाचे अनेकदा उद्घाटनही झाले पण प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात दोन केंद्रीय आणि राज्यातील सरकारमधील तीन कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र असे असतांना शहरातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचा प्रश्न काही मार्गी लागतांना दिसत नाही.

Opposition Leader Ambadas Danve-Minister Bhumre News
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अपशकुन नको म्हणून शांत होतो: रविंद्र गायकवाड

औरंगाबाद-पैठण रस्ता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघातील असूनही, रस्त्यांवरील खड्डे आणि चौपदरीकरणाचा मुद्दा कायम आहे, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी मंत्री भुमरे यांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in