Bhumre : आम्ही क्रांती केली म्हणून खैरेंना किंमत, अन्यथा त्यांना मातोश्रीवरही येऊ देत नव्हते..

खैरे यांनी स्वतः माझ्याकडे यासंदर्भात खंत व्यक्त करत मातोश्रीचे आता अवघड झाले आहे, अशी भावना व्यक्त केली होती. (Minister Sandipan Bhumre)
Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News, Beed
Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News, BeedSarkarnama

औरंगाबाद : शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना असा संघर्ष गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांचे वस्त्रहरण असे प्रकार दोन्ही बाजूंनी सध्या सुरू आहेत. राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनीच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर सडकून टीका केली.

आम्ही क्रांती केली म्हणून खैरे यांना महत्त्व आले आहे, अन्यथा त्यांना मातोश्रीवर देखील प्रवेश मिळत नव्हता, असा दावा भुमरे यांनी केला आहे. (Shivsena) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त (Beed) बीड येथे ध्वजारोहण केल्यानंतर प्रसार माध्यमांनी भुमरे यांना खैरेंकडून होत असलेल्या टीके संदर्भात विचारणा केली.

यावर भुमरे म्हणाले, चंद्रकांत खैरे यांना आता काही काम उरलेले नाही. आम्ही क्रांती केल्यामुळे त्यांना थोडीफार किंमत आली आहे, अन्यथा यापूर्वी त्यांना मातोश्रीवर देखील लवकर प्रवेश दिला जात नव्हता.

Minister Sandipan Bhumre-Chandrakant Khaire News, Beed
एमआयडीसीतील भुखंडांना स्थगिती; दानवेंचा आरोप, मुख्यमंत्री म्हणाले फक्त आढावा घेतोय..

खैरे यांनी स्वतः माझ्याकडे यासंदर्भात खंत व्यक्त करत मातोश्रीचे आता अवघड झाले आहे, अशी भावना व्यक्त केली होती. आमच्याकडे शिंदे गटात खैरेंच्या आरोपांना कवडीची किंमत दिली जात नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यात वेळ न घालवण्याचे आम्ही ठरवले आहे, असा टोला देखील भुमरे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in