Bhokardan : आमदार चहा, तसा खासदार चहा येणार, तो भारी असेल ; दानवेंची टोलेबाजी..

हा स्वादिष्ट देऊन चांगल्या प्रकारे टिकवून कसा ठेवता येईल याकडे तू जास्त लक्ष दे. नाहीतर टेबलावर चहा आणि टेबलाच्या खालून "नगरची भिंगरी" विकशील असे करू नको. (Raosaheb Danve)
Minister Raosaheb Danve News, Jalna
Minister Raosaheb Danve News, JalnaSarkarnama

भोकरदन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे टोलेजाबीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपल्या कार्यक्रमात, नव्या दुकानाच्या उद्धाटनाला दादा आले पाहिजे असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे शक्यतो दानेव आपल्या कार्यकर्त्यांना नाराज करत नाही. कार्यकर्त्याच्या आमदार चहा स्टाॅलच्या उद्धाटनाला दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे, आमदार संतोष दानवे ,संजना जाधव शिवम पांडे यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Minister Raosaheb Danve News, Jalna
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची कृती अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ; अनिसंचा आरोप!

भोकरदन या आपल्या गावात एका कार्यकर्त्याने आमदार चहाचा स्टाॅल टाकला आणि त्याचे उद्धाटन रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीच करावे असा त्याचा आग्रह होता. भोकरदनमध्येच असल्याने दानवेंनी देखील कार्यकर्त्याचे मन राखले आणि आमदार चहा स्टाॅलचे सहकुटुंब जाऊन उद्घाटन केले. (Jalna) आता आमदार चहा, दानवे खासदार अशावेळी टोला लगावण्याची संधी त्यांनी साधली. आमदार चहा प्रमाणेच आता खासदार चहा देखील येईल आणि तो आमदार चहा पेक्षा भारी, स्वादिष्ट असेल असे म्हणताच उपस्थितांनी दानवेंना दाद दिली.

दानवे म्हणाले, आजच्या काळात व्यवसायात ब्रँडला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अगदी चहाला देखील "आमदार चहा" या ब्रँड नावाखाली विकले जात आहे. अर्थात जसा आमदार चहा आहे तसा काही दिवसात "खासदार चहा" देखील येणार आहे व तो याहीपेक्षा स्वादिष्ट असणार आहे. ज्याप्रमाणे आम्हा राजकारण्यांना आमदारकी व खासदारकी टिकवणे गरजेचे असते त्याप्रमाणे तुला देखील हा आमदार चहा टिकवून ठेवावा लागेल.

चहा विकण्यापेक्षा तो चहा स्वादिष्ट देऊन चांगल्या प्रकारे टिकवून कसा ठेवता येईल याकडे तू जास्त लक्ष दे. नाहीतर टेबलावर चहा आणि टेबलाच्या खालून "नगरची भिंगरी" विकशील असे करू नको, असा चिमटा दानवे यांनी राजू राऊत या आपल्या खास कार्यकर्त्याला लगावला.

दानवेंनी आपल्या भाषणात चहासोबत अप्रत्यक्षरित्या तळीराम व पोलिसांना चिमटा काढल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. कार्यकर्त्याच्या आमदार चहा स्टाॅलच्या उद्धाटनाला दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे, आमदार संतोष दानवे ,संजना जाधव शिवम पांडे यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com