Bhokar Market Committee : मोठ्या कष्टाने उभारलेल्या घरात विरोधकांना थारा देऊ नका..

Nanded : भाजपाचे खासदार जाऊन देवापुढे खोटं बोलले, किमान देवापुढे तरी खोट बोलू नका.
Bhokar Market Committee News
Bhokar Market Committee NewsSarkarnama

Ashok Chavan : देशात आणि राज्यात सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाईने सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे, शेतक-यांची हेळसांड होत आहे. (Nanded) आम्ही सत्तेत असताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले, शेतक-यांसाठी काळे कायदे करणारे सत्ता मिळाल्यावर झपाट्याने विकास करू म्हणणारे कुठे आहेत? स्थगिती सरकारला जनता वैतागली आहे. माझ्या मतदारसंघात विकासात्मक कामे ब-यापैकी मार्गी लागली आहेत.

Bhokar Market Committee News
Nanded Market Committee : काॅंग्रेसची एकाधिकारशाही मोडीत काढा, चिखलीकरांनी प्रचाराचा नारळ फोडला..

त्यामुळे मोठ्या कष्टाने उभारलेल्या घरात विरोधकांना थारा देऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले. भोकर येथील महादेव मंदिरात त्यांना प्रचाराचा शुभारंभ केला. (Bjp) येथील जनतेने शंकरराव चव्हाण आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ दिली. आपल्यातील जिव्हाळा अधिकच वाढत गेला, एकमेकांच्या सुख दु:खात धाऊन आलो.

भोकर विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणल्याने लोकाभिमुख विकासकामांना गती मिळाली आहे. (Pratap Patil Chikhalikar) मी कुठे ही असो माझं लक्ष माझ्यावर नितांत प्रेम करणा-या जनतेकडे असतं. मोठ्या कष्टाने हा डोलारा उभा केला आहे. ऐनवेळी कुणीही येवून आलीशान बंगल्यात राज करण्याचे स्वप्न रंगवत आहेत. विरोधकाचे स्वप्नं साकार होऊ नये, म्हणून मी या निवडणूकीत लक्ष देत आहे.

भविष्यातही मी सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, चिंता करण्याची गरज नाही, असा विश्वास चव्हाण यांनी उपस्थितांना दिला. हंगामात फळांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. एरवी मात्र ती फळे दिसत नाहीत. निवडणूकीच्या हंगामात बरीच नेतेमंडळी इकडून तिकडे कोलांटउड्या मारतात. ते स्थिर नसल्याने मनाची घालमेल होत असते. एरवी त्यांना भाव नसतो, अशामुळे दुस-यावर काही परिणाम होत नाही.

शेवटी मतदार ठरविणार कोण योग्य आणि अयोग्य. माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे, नव्हे तर एका शब्दावर माघार घेतली, यापेक्षा मला आणखी काय हवे. ज्यानी ऐकलं त्यांना निवडणूक झाल्यानंतर योग्य ठिकाणी स्थान मिळवून देणार, अशी ग्वाही देखील चव्हाण यांनी दिली.

काही नेते मंडळी एरवी कधीच फिरकत नाहीत. निवडणुका तोंडावर आल्या की दौरे सुरू होतात. अमुक मी केलं, तमूक मी केलं.. खरं ते काहीच करत नाहीत. परवा पाळज येथील गणेश मंदिरात भाजपाचे खासदार जाऊन देवापुढे खोटं बोलले. किमान देवापुढे तरी खोट बोलू नका, असा टोलाही चव्हाणांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com