
कळमनुरी : शेतकरी पीकविम्यासाठी पैसे भरतात. पण, नुकसान झाल्यानंतरही शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम मिळत नाही. मग शेतकर्यांनी भरलेला पैसा जातो कुठे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान येथे शनिवारी (ता. १२) सायंकाळी झालेल्या कोपरा सभेत विचारला.व्यासपीठावर नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, रजनी सातव, डॉ. प्रज्ञा सातव, दिलीप देसाई यांची उपस्थिती होती.
राहुल गांधी पुढे म्हणाले, "आज रस्त्यात एक शेतकरी भेटला. तो म्हणाला, समोर माझे शेत आहे. त्याचे शेत पाहिले. सोयाबीन हातून गेले होते. त्याने पंतप्रधान पीकविम्यासाठी पैसे भरूनही त्याला पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. मग हे पैसे गेले कुठे? ते हवेत तर गेले नाहीत. हा पैसा कुणाच्या तरी खिशात गेला. यावेळी त्यांनी देशातील उद्योगपतींच्या मक्तेदारीवर भाष्ये केले. "तीन -चार अब्जाधीश काहीही करू शकतात. त्यांनी रस्ते, बंदरे विमानतळ घेतले. पण, महागाई, बेरोजगारी याने सर्व सामान्य जनता त्रस्त झाली, असेही राहुल गांधी म्हणाले.
समाजात हिंसा, द्वेष पसरु नये म्हणून ही यात्रा आहे. काही लोक हेलीकॉप्टर ने जातात भाषण करतात, जसे की पंतप्रधान करतात. आम्हाला यात्रेची गरज का पडली. काही दिवसांपूर्वी मी माईक बंद असल्याची गंमत केली. संसदेत जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यावर बोलू दिले जात नाही. म्हणून एकच मार्ग राहिला. लोक जिथं चालतात तिथे आम्ही चालायला लागलो, असेही गांधी म्हणाले.
सातवांची येतेय आठवण :
राजीव सातव हे आपल्यात नाही. याचे दु:ख वाटते. यासाठी की, ते माझे मित्र होते. ते अधिक चांगले काम करत होते. माझी त्यांची जेव्हा भेट व्हायची तेव्हा तुमचाच आवाज त्यांच्या तोंडून निघायचा. ते स्वतः विषयी कधी बोललाच नव्हते. आज आनंद याचा आहे, की त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या पदयात्रेत दिवसभर सोबत होत्या, असे म्हणत राहुल गांधी भावूक झाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.