Rahul Gandhi| Bharat Jodo Yatra|
Rahul Gandhi| Bharat Jodo Yatra|

Bharat Jodo Yatra : 'हिंसा आणि द्वेष वाढवणे हाच भाजप, आरएसएस 'चा अजेंडा'

BJP| RSS| ही भारताची देशभक्ती नसून आरएसएसची देशभक्ती

हिंगोली : आधी भीती पसरवून द्वेष वाढवायचा आणि द्वेश वाढला की हिंसा वाढवायची, हा आरएसएस आणि भाजपचा अजेंडा आहे, भाजप भीती, हिंसा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. नोटाबंदी असो, अग्निवीर असो, जीएसटी असो... त्यांची सर्व धोरणे लोकांना घाबरवतात. जिथे भीती असते तिथे द्वेष निर्माण होतो. ज्यामुळे समाजात फूट पडते. यानंतरही ते स्वत:ला देशभक्त असल्याचे सांगतात, अशी टीका कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी (ता. 14) येथे झालेल्या कोपरा सभेत केली.

Rahul Gandhi| Bharat Jodo Yatra|
बनावट जातप्रमाणपत्र प्रकरण : राणांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

याचवेळी त्यांनी महागाई, अग्निवीर, उद्योजकांची कर्जमाफी, बेरोजगारी, नोटाबंदी, जीएसटी या विषयांवरुनही मोदी सरकारवर सडकून टीका केली. ''लोकांचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून हटवून धर्मावर न्यायचे. त्यांच्या मनात भीती निर्माण करायची. आरएसएसची देशभक्ती काय आहे? शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करणे ही देशभक्ती आहे, चुकीचा जीएसटी लागू करणे ही देशभक्ती आहे, देशात द्वेष पसरवणे ही देशभक्ती आहे, बेरोजगारी ही देशभक्ती आहे आणि महागाई ही देशभक्ती आहे. ही भारताची देशभक्ती नसून आरएसएसची देशभक्ती असल्याचा घणाघात यावेळी राहुल गांधी यांनी केला.

देशातील 'दोन-तीन अब्जाधीशांना' फायद्यासाठी पंतप्रधान मोदी यांना 'मेड इन चायना' उत्पादने हवी आहेत. सध्या आपण जे मोबाईल फोन वापरत आहोत. ते फोन त्यातील पार्ट हे मेड इन चायना आहेत. आपले दोन उद्योजक ते विकत आहेत. फोन आणि इतर वस्तू मेड इन इंडियाच नव्हे तर मेड इन हिंगोली, मेड इन लातूर, मेड इन औरंगाबाद व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in