Bharat Jodo Yatra : राहुल गांधीच्या यात्रेत शेतकरी-कामगारांनी मनातलं बोलून दाखवलं!

Bharat Jodo Yatra : तरूणांच्या हातात काम मिळाले तरच भारत महासत्ता बनेल.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra Sarkarnama

अर्धापूर : देशात निर्माण झालेली सामाजिक कटुता संपली पाहिजे, शेतमालाला भाव, महागाईवर नियंत्रण व‌‌ हाताला काम मिळावे, शेतीला सिंचनासाठी कालव्याचे मोफत पाणी पुरवठा, सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा समजून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा आम्हाला नेता हवायं, अशा भावना भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या राज्यातील विविध भागांतील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये एक आत्मविश्वास, निर्माण झाला आहे. यामुळे देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळेल असा आशावाद सकाळशी बोलताना व्यक्त केला.

शेतीला मोफत पाणी पुरवठा व्हावा : युवराज जगदाळे पळुस कडेगांव (जिल्हा सांगली)

देशातील शेतकरी देशोधडीला लागत आहे. शेती करणे परवडत नाही. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतमालाल हमी भाव वाढून मिळाला तर शेतकरी सुखी होईल. शेतीला मोफत पाणी पुरवठा करुन, पाणी पट्टी माफ करा. अशी भावना युवराज जगदाळे यांनी व्यक्त केल्या.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra : राहुल गांधीच्या यात्रेत डिआयजी निसार तांबोळी पोलिसांना म्हणाले, 'हाऊज द जोश..'

स्त्रियांची सुरक्षा धोक्यात : अॅड वर्षा देशपांडे (जिल्हा सातारा) :

महागाईमुळे सामान्यांचे जीवन जगणं अवघड झाले आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आली असून, कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्यात येत आहेत. याचा मोठा परिणाम स्त्री शिक्षणावर होणार आहे. येणाऱ्या काळात बदल दिसून येईल, असा विश्वास वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केला.

हाताला काम मिळावे : सुदर्शन कदम (परभणी)

आमचं सारं आयुष्य शिक्षणात जात आहे.पदव्यांचे ओझे वाहवावे लागत आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरूणांच्या हातात काम मिळाले तरच भारत महासत्ता बनेल, अशी भावना सुदर्शन कदम यांनी व्यक्त केल्या.

Bharat Jodo Yatra
Chitra Wagh : चित्रा वाघ को घुस्सा क्यों आता है? पुढील दिवसांत उत्तर मिळेल का?

शेख ईर्शाद : ( अर्धापूर जिल्हा नांदेड )

देशातील सामाजिक वातावरण बिघडणाऱ्या घटना झाल्या आहेत. अल्पसंख्याक समाज विकासापासून वंचित राहिला आहे. त्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असा आग्रही भूमिका शेख ईर्शाद यांनी मांडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in