Bharat Jodo : गुजरात, हिमाचलमध्ये का नाही ? जयराम रमेश यांनी सांगितले कारण..

आधीच्या राज्यात पदयात्रेची सरासरी २० किलोमीटर होती ती महाराष्ट्रात २४ इतकी झाली आहे. यात्रेनिमित्त देशात जेवढे जायला पाहिजे होते, तेवढे जाता आले नाही. (Jayram Ramesh, Congress)
Jayram Ramesh Press News, Nanded
Jayram Ramesh Press News, NandedSarkarnama

औरंगाबाद : भारत जोडो यात्रा गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये गेली असती तर, तेथील संघटन हे यात्रेवर खर्ची पडले असते आणि निवडणूकीकडे दुर्लक्ष झाले असते. म्हणूनच त्या राज्यात यात्रा नेण्याचे टाळले, असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत सांगितले.

Jayram Ramesh Press News, Nanded
Bharat Jodo : इंदिरा गांधींचा नातू पाहिला गं बाई..

जयराम रमेश म्हणाले, "महाराष्ट्रातून फक्त पाच जिल्ह्यातूनच ही यात्रा का? असं सातत्याने विचारतात पण, भौगोलिकदृष्ट्या आणि खासदार (Rahul Gandhi) राहुल गांधी यांची सुरक्षा याचा विचार करता हा मार्ग अंतिम केला. इतर मार्गाने निव्वळ पदयात्रा झाली नसती. (Congress) उलट आम्हाला यात्रेतून जो संदेश द्यायचा आहे, तो नागपुरच्या कुंभकर्णाला देता आला असता तर, चांगलेच झाले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली.

आधीच्या राज्यात पदयात्रेची सरासरी २० किलोमीटर होती ती महाराष्ट्रात २४ इतकी झाली आहे. यात्रेनिमित्त देशात जेवढे जायला पाहिजे होते, तेवढे जाता आले नाही. गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये इच्छा असून जाता येत नाही, अशी खंतही रमेश यांनी व्यक्त केली. ईडी, सीबीआय हे मोदी सरकारचे दोन भाऊ आहेत. त्यांचा वापर राजकीय हत्यार म्हणून करत आहेत.

धमकी देण्यासाठी आणि विरोधकांना लाईनवर आणण्यासाठी त्याचा वापर केंद्र सरकार करत आहे. संपुआ होती तोवर सहकारावर कर लागत नव्हता, मोदी सरकारने तो आणला, आम्ही सत्तेत आल्यावर तो कर पुन्हा रद्द करु, असे आश्वासन देखील रमेश यांनी दिले.

शरद पवारांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा नेते खासदार शरद पवार हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार होते. पण प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते येऊ शकणार नाहीत म्हटल्यावर राहुल गांधी यांनी फोन करुन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. डॉक्टरांनी पवारांना तीन आठवडे विश्रांती घेण्याचे सांगितले असल्याचे जयराम रमेश यांनी माध्यमांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in