Bharat Jodo : हजारोंच्या गर्दीतही राहूल गांधींचे लक्ष `त्या` चिमुकलीकडे गेलेच..

प्रणिता प्रकाश कामळजकर ही चिमुकली आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन होती. तिला बाबासाहेबांची प्रतिमा राहुल यांना द्यायची होती. (Bharat Jodo)
Bharat Jodo Rally In Maharashtra News, Nanded
Bharat Jodo Rally In Maharashtra News, NandedSarkarnama

नांदेड/नायगाव : सर्वसामान्यांशी संवाद, त्यांच्या समस्या जाणून घेत आपुलकीने विचारपूस करणे हे राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे वैशिष्ट दिसून आले आहे. सामान्य मग ती व्यक्ती मोठी असो की छोटी, हातात हात घेऊन गांधी हे भारत जोडोसाठी निघाले आहेत. त्यामुळे हजारोंच्या गर्दीत देखील त्यांच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटत नाही हे आज पुन्हा दिसून आले.

Bharat Jodo Rally In Maharashtra News, Nanded
Bharat Jodo Yatra : राहूल गांधींसोबत पृथ्वीराजबाबा चार किलोमीटर चालले....

नायगावं येथील पदयात्रे दरम्यान, आपल्या वडिलांच्या खांद्यावर हातात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन असलेल्या चिमुकलीकडे राहूल गांधी (Rahul Gandhi) याचे लक्ष गेले. ती प्रतिमा भेट देण्यासाठी ती त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होती. (Congress) पण अर्थात सुरक्षा भेदत तिथपर्यंत पोहचणे त्या छोट्या जीवाला शक्य नव्हते. पण राहूल गांधी यांनी त्या चिमुकलीची तळमळ लांबवरून ओळखली आणि तिला आपल्याकडे बोलवत तिच्या प्रेमाची भेटही स्वीकारली.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा बुधवारी (ता. नऊ) महाराष्ट्रातील तिसरा दिवस होता. यात्रेचे पहिले सत्र सकाळी सहाला शंकरनगर येथून सुरू झाले. दरम्यान, पहाटे पाच वाजतापासून कडाक्याच्या थंडीतही हजारो कार्यकर्ते, नागरिक यांनी गर्दी केली होती. लेझिम पथक, शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन यामुळे यात्रेत मोठा उत्साह दिसून आला. यात्रेत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय दिसून आली. थंडीतही नायगाव परिसरातील रस्त्यावर किशोरवयीन विद्यार्थी राहुल गांधी यांची वाट पाहत उभे होते.

त्यात कुणी इंदिरा गांधी तर कुणी महात्मा गांधी, पंडित नेहरू यांची वेशभूषा केलेली होते. काहींच्या हाती तिरंगा ध्वज होता. 'देश का नेता कैसा हो' आशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तरुण महागाईच्या विरोधात नारे देत होते. कुणी गाणे म्हणत होते. चालता-चालता राहुल हे सर्वसामान्य नागरिक, मजूर, विद्यार्थी, महिला, शेतकरी यांच्या भेटीगाठी घेत अडचणी ऐकून घेत होते. मुंबईहून भारत जोडो यात्रेत दाखल झालेल्या कोळी बांधवांनी राहुल यांची भेट घेतली. हातात मासळीची प्रतिकृती घेऊन भारत जोडो यात्रेत कोळी बांधव सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या.

'राहुल राहुल' असे ओरडत तरुण-तरुणी पळत होते, चालत होते. मात्र, एखाद्या दुसऱ्यालाच राहुल यांच्याशी हस्तांदोलन करण्याची संधी मिळत होती. सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही पदयात्रा सव्वातीन तासांचा पायी प्रवास करून साडेनऊच्या सुमारास नायगावमध्ये पोचली. शहरात माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी त्यांचे शहरात स्वागत केले. नायगावमध्ये कुसुम लॉन्स याठिकाणी सकाळच्या सत्रातील पहिला विश्राम राहुल यांनी केला.

Bharat Jodo Rally In Maharashtra News, Nanded
Bharat Jodo Yatra : सुरक्षा भेदत बांधावर सरसर चढत राहुल गांधींनी युवकांशी साधला संवाद..

नरशी फाट्यावरून सकाळी यात्रा नायगावकडे येत होती.‌ रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक उभे होते. त्यात नायगाव येथील प्रणिता प्रकाश कामळजकर ही चिमुकली आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेऊन होती. तिला बाबासाहेबांची प्रतिमा राहुल यांना द्यायची होती. पण, सुरक्षेमुळे ती तिथे पोचू शकत नव्हती. हे चालता-चालता राहुल यांनी हेरले. त्यांनी तत्काळ त्या चिमुकलीला जवळ घेत तिच्याकडून बाबासाहेबांची प्रतिमा घेतली. या यात्रेदरम्यान राहुल यांनी अनवाणी पायाने यात्रेत सहभागी झालेल्या कस्तुरबा गांधी विद्यालयातील शिक्षक महादेव किशन रेड्डी यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. त्यांच्याकडून समस्या ऐकून घेतल्या.

यात्रेतील क्षणचित्रे

- राहुल यांच्या पूर्वी कन्हैयाकुमार नायगावात दाखल.

- पंडित नेहरू यांनी देशस्वातंत्र झाल्यानंतर जे भाषण केले होते ते भाषण स्वागतस्थळी श्रीनिवास मेहुवाल या विद्यार्थ्याने कन्हैयाकुमारांच्या उपस्थित केले.

- राहुल गांधी यांना बघण्यासाठी विद्यार्थी उत्सुक

- राहुल गांधी पोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

- दिग्विजय सिंह, जयराम रमेश यांचाही सहभाग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com