Bharat Jodo : `अरे बघतो कोण अडवणार`, खणखणीत आणि दणदणीत मराठी गाणे लॉंच

दृकश्राव्य गीत तीन मिनिटे पाहणाऱ्यांना खिळवून ठेवणारे आहे. शब्द आणि दृश्य या दोन्हींचा सुंदर मिलाप करण्यात आला आहे. (Bharat Jodo)
Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi, Bharat Jodo YatraSarkarnama

नायगाव : 'वादळ वाऱ्यांचा काळ असो, कठीण कितीही वाट दिसो ही वाटचाल ना थांबणार! अरे बघतो कोण अडवणार?' हे भारत जोडो यात्रेतील नवीन मराठी गाणं महाराष्ट्रभर घुमणार आहे. कॉंग्रेसने‌ ते बुधवारी (ता. आठ) येथे प्रदर्शित केले. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात प्रवेश केलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra
Bharat jodo : राज्यभरातील काॅंग्रेसचे नेते नांदेडमध्ये, पण शेजारच्या लातूरचे देशमुख बंधु मात्र गायब..

राहुल गांधींचा (Rahul Gandhi) उत्साह आणि महाराष्ट्रात प्रवेश करताच देगलूरमधल्या पहिल्याच भाषणात, 'कोणी अडविण्यास आले तरीही मागे हटणार नाही; थांबणार नाही', असे ठणकावून सांगितले होते. (Congress) तेच शब्द आता यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी असणार आहेत. राहुल यांच्या यात्रेवरील मराठी गाणे रिलीज करण्यात आले आहे. त्या गाण्यातील पहिल्याच कडव्यामध्ये त्यांनी यात्रेचा इरादा स्पष्ट केला.

कॉंग्रेस रस्त्यावरचा संघर्ष करायला तयार आहे. असाच संदेश देण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. यात्रेचा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन गाण्याचे शब्द लिहिण्यात आले आहेत. दृकश्राव्य अशा दोन्ही स्वरूपात हे गाणे आहे. गाण्यात शब्दांसोबत व्हिजवल्सचाही वापर करण्यात आला आहे.

यात्रा सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत कसा प्रतिसाद मिळाला, यावरचे व्हिजवल्स वापरण्यात आले आहेत. त्यामुळे दृकश्राव्य गीत तीन मिनिटे पाहणाऱ्यांना खिळवून ठेवणारे आहे. शब्द आणि दृश्य या दोन्हींचा सुंदर मिलाप करण्यात आला आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास असलेल्या या यात्रेत अनेक रंग, भारताची ओळख, एकात्मता दाखवण्यात आली आहे.

ज्या प्रश्नांमुळे लोक यात्रेशी जोडले जात आहेत, त्या मुद्द्यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. `महागाई वर मात करू बेरोजगारीशी दोन हात कर प्रगती ची आस ठेऊया सद्भावनेची कास धरुया`, या ओळी देखील प्रभावी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com