भंडारा जिल्हा परिषद : बांधकाम समितीवरून पटोले, वाघमारे भिडणार...

भंडारा Bhandara जिल्हा परिषदेत Zilla Parishad माजी आमदार चरण वाघमारे Charan Waghmare किंग मेकर King maker ठरले आहेत. कारण त्यांच्या गटाने एक उपाध्यक्ष व एक सभापती पद मिळवून घेतले आहे.
भंडारा जिल्हा परिषद : बांधकाम समितीवरून पटोले, वाघमारे भिडणार...
Nana Patole, Charan Waghmaresarkarnama

भंडारा : भंडारा जिल्हा परिषदेच्या उद्या होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेमुळे जिल्हातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून बांधकाम विभागासाठी काँग्रेस आणि माजी आमदार चरण वाघमारे यांच्या फुटिर भाजप गटात रस्सीखेच सुरु झाली आहे. याचा परिणाम म्हणून की काय या पहिल्या सभेत बांधकाम समितीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेभाजप गटाचे फुटिर नेते चरण वाघमारे यांच्यात विवाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक 10 मे रोजी झाली असून काँग्रेस पक्षाने चरण वाघमारे यांच्या फुटिर भाजप गटासोबत हात मिळविणी करत सत्ता स्थापन केली. यात माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपली राजकीय खेळी करत केवळ सहा सदस्य (5 भाजप+ 1 अपक्ष) निवडून आणले असतांना सुद्धा सर्वाधिक 21 सदस्य पदे मिळविण्याऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या काँग्रेस पक्षाला झुकवत उपाध्यक्ष पदरात पाडून घेतले.

Nana Patole, Charan Waghmare
संभाजीराजे छत्रपती खासदार झाले नाहीत हे दुर्देवी; काँग्रेसचा त्यांना पाठिंबा : नाना पटोले

मात्र, परंपरांगत मित्राने साथ सोडण्याने नाना पटोले यांनी आपली प्रतिष्ठा वाचवत सत्ता स्थापनेसाठी चरण वाघमारे यांना झुकते माप दिले. यात काँग्रेस नेते गंगाधर जिभकाटे अध्यक्ष झाले असून चरण वाघमारे यांच्या फुटिर गटाचे संदीप ताले उपाध्यक्ष झाले आहे. दरम्यान, यात महिन्यात 19 मे झालेल्या भंडारा जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडीत ही पुन्हा काँग्रेस -भाजपच्या फुटिर गटाने बाजी मारत चार पदावर आपला ताबा मिळविला.

Nana Patole, Charan Waghmare
अखेर चरण वाघमारे ठरणार गेम चेंजर; सरकारनामाचे भाकीत खरे ठरले...

यात रमेश पारधी (काँग्रेस), मदन रामटेके (काँग्रेस), सौ. स्वाती वाघाये (काँग्रेस), राजेश सेलोकर (भाजप फुटिर गट) यांनी निवडणूक जिंकून नवनिर्वाचित सभापतीपदाची माळ गळ्यात पाडुन घेतली आहे. यात ही काँग्रेसचे तीन सभापती झाले असून चरण वाघमारे यांच्या फुटिर भाजप गटाने पुन्हा आपली राजकीय खेळी खेळत एक सभापती आपल्या गळ्यात पाडुन घेतले आहे. आता चार सभापती व एक उपाध्यक्ष यांच्यात खाते वाटप होणार होते. मात्र, यात समाज कल्याण समितीवर काँग्रेसचे मदन रामटेके तर महिला व बाल विकास समितीवर सौ. स्वाती वाघाये निवडणूक आल्या.

Nana Patole, Charan Waghmare
भंडारा भाजपमध्ये गटबाजीने आग : बावनकुळेंचा बंब रवाना...

त्यामुळे उरलेल्या तीन पदाधिकाऱ्यांत (उपाध्यक्ष व 2 सभापती) मध्ये उरलेल्या सहा विषय समितींचे वाटप होणार आहे. यात बांधकाम, अर्थ, आरोग्य, शिक्षण, कृषी व पशुसंवर्धन यांचा समावेश आहे. आता यात बांधकाम विभाग महत्वाचा असून यासाठी सद्धा दोन नेत्यांत रस्सीखेच सुरु झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्य रमेश पारधी यांना हे बांधकाम पद मिळवून देण्यास आतापासून लॉबिंग करत असून नाना पटोले यांच्या पर्यंत कार्यकर्त्यांनी आपली इच्छा पोहोचवली आहे.

Nana Patole, Charan Waghmare
भंडारा जि.प. उपाध्यक्षांसह ३ सदस्य अडचणीत; अ‍ॅट्रॉसिटी अन् विनयभंगाचा गुन्हा दाखल

तर चरण वाघमारे गट ही बांधकाम विभागासाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन बसले आहे. तसा दबाब ही चरण वाघमारे उद्या होणाऱ्या बैठकीत नाना पटोले गटावर टाकणार आहेत. त्यामुळे बांधकाम विभाग नाना पटोले व चरण वाघमारे यांच्यात वितुष्ठ निर्माण करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, भंडारा जिल्हा परिषदेत माजी आमदार चरण वाघमारे किंग मेकर ठरले आहेत. कारण त्यांच्या गटाने एक उपाध्यक्ष व एक सभापति पद मिळवून घेतले आहे. आता उद्या होणाऱ्या सभेत चार समिती ते पदरी पाडुन घेणार हे मात्र निश्चित आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये उपरी ठरलेली काँग्रेस आता भंडाऱ्यात जिल्हा परिषदेत ही उपरी ठरणार का, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in