फडणवीस येण्याआधीच अशोक चव्हाणांचा अतिवृष्टी भागाचा दौरा..

( Guardian Minister) पालकमंत्री म्हणून आपला पाहणी दौरा झाला पाहिजे, (Ashok Chavan) म्हणूनच चव्हाण यांनी ही घाई केल्याचे बोलले जाते.
Ashok Chavan-Devendra Fadanvis
Ashok Chavan-Devendra FadanvisSarkarnama

नांदेड ः महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री, मंत्री आपल्या भागातील नुकसानग्रस्त भागात फिरकत नसल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपने केली होती. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

फडणवीस उद्या थेट नांदेड जिल्ह्यातूनच आपल्या पाहणी दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने या दौऱ्याची आखणी केल्याचे बोलले जाते. विरोधी पक्षनेते दौरा करणार म्हटल्यावर त्यांच्या आधी पालकमंत्र्यांचा दौरा झाला पाहिजे, म्हणून मग अशोक चव्हाण मुंबईतील पक्षाची बैठक संपवून थेट नांदेडात आले आणि लगबगीने त्यांनी अतिवृष्टग्रस्त भागाचा दौरा करत पाहणी केली.

चव्हाण यांच्या या अचानक दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवंगत काॅंग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. काॅंग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत इथे होणार असली तरी काॅंग्रेसकडून ही जागा राखण्याचा दावा केला जात आहे.

राजकीय वातावरण तापलेले असतांनाच जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे पीकं, शेती, जमीनी, घरांची पडझड, गुराढोरांची झालेली वाताहात या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी आज अर्धापूर तालुक्यात भेट देऊन पाहणी केली. मुंबईत आज राज्यातील विविध प्रश्नांसह पोटनिवडणुकीतील उमेदवारी संदर्भात पक्षाच्या टिळक भवन कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला हजेरी लावल्यानंतर चव्हाण यांनी तातडीने नांदेड गाठले.

Ashok Chavan-Devendra Fadanvis
काॅंग्रेसचा उमेदवार निश्चित, भाजपचे साबणेंच्या पक्ष प्रवेशानंतर ठरणार..

देवेंद्र फडणवीस उद्या (ता.२) नांदेडात येणार असल्यामुळे ते येण्याआधीच पालकमंत्री म्हणून आपला पाहणी दौरा झाला पाहिजे, म्हणूनच चव्हाण यांनी ही घाई केल्याचे बोलले जाते. दरम्यान, या पाहणी दौऱ्या दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आपण जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाचा दोन दिवस दौरा करणार असल्याचे सांगितले. दौरा पुर्ण झाल्यानंतर परिस्थितीची सविस्तर माहिती शासनाला देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com