Beed : पंकजा मुंडेंच्या मंत्रीपदासाठी महिलांची बीड ते मोहटादेवी पायी दिंडी

पंकजा मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल असा आशावाद आणि विश्वास समर्थकांना वाटत आहे. (Beed)
Bjp Leader Pankaja Munde News
Bjp Leader Pankaja Munde NewsSarkarnama

बीड : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील खातेवाटप व संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत चर्चा सुरु आहे. यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मंत्रीपद भेटावे, यासाठी बीड ते मोहटादेवी पायी दिंडी निघाली आहे. (Beed) महिला समर्थकांच्या दिंडीची सुरुवात गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन झाली.

राज्यातील सत्तांतरानंतर संभाव्य मंत्रीमंडळात कोण - कोण अशी चर्चा होत आहे. तत्पुर्वीच विधान परिषदेच्या निवडणुकीतही पंकजा मुंडे यांना स्थान मिळावे, अशी मागणी पंकजा मुंडे समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर झाली होती. (Bjp) मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला.

पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघातून पराभव झाल्यानंतर विधान परिषद व राज्यसभेवर इतरांना संधी मिळाली. मात्र, पंकजा मुंडेंना टाळल्याने त्यांच्या समर्थकांनी संतापही व्यक्त केला. सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव व मध्य प्रदेशच्या भाजपच्या सहप्रभारी असलेल्या पंकजा मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळेल असा आशावाद आणि विश्वास समर्थकांना वाटत आहे. तरीही आता त्यांच्या मंत्रीपदासाठी मोहटादेवीला साकडे घालण्यासाठी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पायी दिंडी काढली आहे.

Bjp Leader Pankaja Munde News
कंत्राटदार, हात अडकलेले अन् भाडोत्री लोकच शिरसाटांच्या रॅलीत ; अंबादास दानवेंचा आरोप

अॅड. संगीता धसे, शैला मुसळे व संजीवनी राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. डोक्यावर तुळस, हातात झांज व गळ्यात कवड्यांच्या माळा घालून इतर महिलाही या पायी दिंडीत सहभागी झाल्या आहेत. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, विक्रांत हजारी, डॉ. लक्ष्मण जाधव, प्रा. देविदास नागरगोजे, जगदीश गुरखुदे आदींच्या उपस्थितीत दिंडीची सुरुवात झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com