Beed : व्यक्तीगत प्रकरणांत `स्टे`मधून आरोग्यमंत्री सावंतांना `साध्य` काय ?

बीड जिल्ह्याशी संबंधीत आणखी एका घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांवरील कारवाईलाही मंत्री तानाजी सावंत यांनी स्थगिती दिली आहे. (Beed News)
Health Minister Tanaji Sawant News, Beed
Health Minister Tanaji Sawant News, BeedSarkarnama

बीड : विद्यमान सरकारला नवनवे जिआर काढण्याचा आणि तेवढ्याच जुन्या निर्णयांना स्थगिती देण्याचा आघाडीचा पायंडा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे स्वत:च्याच कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना व व्यक्तीगत विषयांच्या निर्णयांना स्थगिती देण्यामागे नेमके इंगित काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील गाजलेल्या व मोठा घोटाळा असलेल्या बोगस हंगामी फवारणी कर्मचारी प्रमाणपत्रातील अधिकाऱ्यांवरील प्रस्तावित कारवाईलाही त्यांनी स्टे दिला आहे.

Health Minister Tanaji Sawant News, Beed
Shivsena : उद्धव ठाकरे प्रामाणिक, तुम्हीच धोका दिला म्हणून उपमुख्यमंत्री व्हावे लागले..

विद्यमान शिंदे - फडणवीस सरकार जिआर काढण्यात जेवढे आघाडीवर आहे, तेवढेच निर्णयांना स्टे देण्यात पुढे आहे. विशेष म्हणजे मागच्या सरकारमध्ये कार्यरत मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याबरोबरच आताही आज निर्णय आणि उद्या स्थगिती असा कारभार सुरु आहे. (Beed News) यामागे काही राजकीय हितसंबंध व परिणामांबरोबच व्यक्तीगत इंटरेस्टचाही वास अशा बदलांमुळे सामान्यांना येत आहे. दरम्यान, राज्याचे (Tanaji Sawant)आरोग्यमंत्री म्हणून कारभार हाती घेताच तानाजी सावंत यांनी नवरात्रोत्सवा निमित्त `माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान` ची घोषणा केली.

२६ सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर या कालावधीत अभियानात राज्यभरात १८ वर्षांवरील तीन कोटी १२ लाख महिलांच्या आरोग्य तपासणीचे ध्येय ठरविण्यात आले. परंतु आरोग्यमंत्रयांच्या संकल्पनेतील महत्वकांक्षी अभियानात राज्यभरात २० लाख महिलांचीही तपासणी झाली नाही. त्यामुळे वारंवार अभियानाचा कालावधी वाढविण्यात आला. आताही दिड महिन्यानंतर राज्यभरात हा आकडा अडीच कोटींच्या पुढे गेला असला तरी यात आकडे वाढीसाठी शाळकरी मुलींची संख्याही घुसवण्यात आली आहे हे विशेष.

आरोग्य मंत्री म्हणून तानाजी सावंत यांचे पहिलेवहिले व तळागळापर्यंत जाणारे महत्वकांक्षी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान `फेल` ठरले असले तरी व्यक्तीगत विषयांत निर्णय घेणे किंवा त्यालाच स्टे देण्यात मात्र त्यांची तत्परता अधिक आहे. यातून `साध्य` काय केले जातेय हा विषय अलहिदा आहे. ११ नोव्हेंबरला राज्यातील उपसंचालक, सहसंचालक व जिल्हा शल्यचिकीत्सक संवर्गातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्यपातळीवरुन निर्गमित झाले. सहाजिकच निर्णयापूर्वी सदर फाईल मंत्र्यांकडे गेली. त्यांच्या मान्यतेनंतरच बदल्यांचे आदेश निर्गमित झाले.

मात्र, माशी कुठे शिंकली माहित नाही आणि दुसऱ्याच दिवशी तानाजी सावंत यांनी आपल्या पुण्यातील घराच्या कार्यालयातून या बदल्यांना स्थगिती दिली. स्थगितीचे कारण `राज्यात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान`असल्याचे नमूद केले खरे पण अभियानाला त्यानंतर दोनच दिवसांचा अवधी होता. त्यातही पुन्हा असे काही बदल झाले आणि मग मुंबईहूनच संबंधीत उपसंचालक कार्यालयात निरोप धडकले आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या मुव्हमेंट ऑर्डर काढण्याच्या सुचना देण्यात आला.याच दरम्यान अगोदर बदली, नंतर स्टे आणि पुन्हा रुजू करुन घेण्याचे आदेश या चक्रामागे नेमके इंगीत काय, याची चर्चा आता आरोग्य विभागात होत आहे.

Health Minister Tanaji Sawant News, Beed
Marathwada : चिकटगांवकरांचा विरोध, तरीही पंकज ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश..

याच दरम्यान, बीड जिल्ह्याशी संबंधीत आणखी एका घोटाळा प्रकरणात अधिकाऱ्यांवरील कारवाईलाही मंत्री तानाजी सावंत यांनी स्थगिती दिली आहे.जिल्हा हिवताप कार्यालयात २००६ पासून हंगामी फवारणी कर्मचारी भरती बंद असताना २०१७ ते २०२१ या कालावधीत शेकडो बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रमाणपत्राअधारे नोकरी मिळविण्याच्या प्रकारामुळे हा सगळा भांडाफोड झाला. याच्या चौकशीत प्रमाणपत्र घेणारे आणि देणारेही अडकले.

प्रमाणपत्र घेणाऱ्या ६९ जणांविरुद्ध रविवारी बीडमध्ये फसवणूकीसह इतर कलमांन्वये गुन्हे नोंद झाले. मात्र, प्रमाणपत्र देणाऱ्यांच्या साखळीची फिल्डींग थेट मंत्रालयापर्यंत पोचली होती. प्रमाणपत्र देणाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित होती. मात्र, त्यांनीही कारवाई करु नये अशी विनंती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना केली आणि सावंत यांनी तत्काळ या कारवाईला स्थगिती दिली. कारवाईला स्थगीती देण्याची किव येण्यामागचे इंगीतही चर्चेचा विषय ठरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in