Beed : दोन खासदार अन् १० आमदार; पण शेतकऱ्यांशी संबंधीत बैठकीला तिघेच..

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक झाली. तर, आमदार प्रकाश सोळंके व आमदार बाळासाहेब आजबे हे दोघेच बैठकीला होते. (Beed News)
Dhnanjay Munde- Prakash Solanke, Ajbe
Dhnanjay Munde- Prakash Solanke, AjbeSarkarnama

बीड : खरीप हंगाम सुरु होताच, उच्च प्रतिच्या खत - बियाणांची टंचाई, बोगस बियाणांची विक्री आणि पिक कर्जासाठी फरफट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली. (Beed) शेतकऱ्यांच्या वरिल प्रश्नांवर कायम सजगता दाखवून निवेदने, आंदोलनाचे इशारे, प्रशासनाकडे मागणी आणि सुचना देणारे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीला मात्र आले नाहीत.

जिल्ह्याला दोन खासदार आणि तब्बल दहा आमदार आहेत. मात्र, खरीप हंगाम पूर्व बैठकीला केवळ तिनच आमदार उपस्थित होते. (Dhnanjay Munde) विशेष म्हणजे बैठकीकडे पाठ फिरविणारे सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत. आता त्यांना शेतकऱ्यांच्या खत, बियाणे, पीक कर्ज वाटप, अतिरिक्त ऊस अशा ज्वलंत विषयांपेक्षा कदाचित इतर महत्वाची कामे, बैठका असू शकतील किंवा महत्वाची अडचणही असू शकेल. (Marathwada)

जिल्ह्यात अलिकडच्या अनेक वर्षांत ठरवून दिलेले पीक कर्जाचे उद्दीष्ट एकदाही पूर्ण झालेले नाही. दर हंगामात बोगस बियाणे आणि खतांच्या तक्रारी असतात. बोगस बियाणांमुळे हजारो एकरांवरील शेतकऱ्यांचे नुकसान होते. दोन वर्षांपूर्वी हजारो एकरांवर पेरलेले सोयाबीन उगवले नव्हते. नैसर्गीक दुष्काळ, अतिवृष्टी सोडल्या तरी शासन - प्रशासनामुळे वीजेचा प्रश्न, बियाणांचा प्रश्न, पीक कर्ज अशा दुष्टचक्रात शेतकरी कायम अडकलेला असतो. त्यानंतर लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कधी रस्त्यावर, कधी निवेदनाच्या माध्यमातून पुढेही येतात.

मात्र, खरीप हंगाम पूर्व नियोजनावेळी मात्र या मंडळींना बैठकीला हजर राहता आले नाही. सोमवारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला विधानसभेच्या सहा आमदारांपैकी मुंडेंसह इतर दोघे होते. तर, खासदार व विधान परिषदेच्या आमदारांपैकी एकाचीही हजेरी नव्हती. जिल्ह्याला लोकसभेचा एक खासदार तर राज्यसभेचा एक खासदार आहे. तसेच सहा विधानसभा मतदार संघासह जिल्ह्याशी संबंधीत विधान परिषदेचे चार आमदार आहेत.

Dhnanjay Munde- Prakash Solanke, Ajbe
MNS : `राजा`च संकटात `साथ` देणाऱ्यांचे काय ?

यापैकी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याच अध्यक्षतेखाली बैठक झाली. तर, आमदार प्रकाश सोळंके व आमदार बाळासाहेब आजबे हे दोघेच बैठकीला होते. तर, विधानसभेच्या आमदारांपैकी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा हजर नव्हत्या. लोकसभेच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे, राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांच्यासह लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे बैठकीला नव्हते.

जिल्ह्यातील सर्वच खासदार व आमदारांना बैठकीचे शासकीय नियमाप्रमाणे निमंत्रण दिले. सर्वांना त्यांच्या कार्यालयांत मेल पाठविले तसेच स्थानिक कृषी अधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी पाठवून पत्र दिल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com