Beed : ठाकरेंना पत्र लिहून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवासैनिकाला, शिंदे गटाकडून मदतीचा हात..

Yuvasena : शेतकरी आत्महत्यांना फक्त शेतकरी लेबल म्हणून आकडे सांगू नका, आत्महत्यांची इतरही कारणे असतात.
Yuvasena Beed News
Yuvasena Beed NewsSarkarnama

Marathwada Political : अंबाजोगाई येथे उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचे तालुका प्रमुख अक्षय भुमकर यांनी युवा सेना विभागीय सचिव विपुल पिंगळे यांच्यावर आरोप करत आत्महत्येचा प्रयत्न केला. तसे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व आदित्य ठाकरे यांना लिहलेले पत्र सोशल मिडीयावर पोस्ट केले होते. या प्रकरणाची संवेदनशिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून अक्षय भुमकर व कुटूंबाला मदत करण्यासाठी आम्हाला पाठविल्याचे शिंदे गट युवासेनेच्या महासचिव शर्मिला येवले यांनी नमूद केले.

Yuvasena Beed News
Aurangabad : महावसुलीचे आरोप असलेल्या कृषी महोत्सवाकडे फडणवीसांनी पाठ फिरवली..

या प्रकरणी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रकरणाची योग्य चौकशी करुन विपुल पिंगळे याला कोणाचा वरदहस्त आहे, त्याच्याबाबत गंभीर तक्रारीनंतरही दखल का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला. (Yuvasena) आम्ही या प्रकरणात राजकारण म्हणून नाही तर माणूसकी म्हणून पाहत असून यातूनच (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांची संवेदनशिलता दिसते असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेच्या मुद्यावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मात्र येवले चांगल्याच गोंधळल्या. तसेच शेतकऱ्यांच्या सर्वच आत्महत्या या कर्जबाजारी, नापिकी किंवा नुकसानीमुळे होत नाहीत, शेतकरी आत्महत्यांना फक्त शेतकरी लेबल म्हणून आकडे सांगू नका, आत्महत्यांची इतरही कारणे असतात, असे वक्तव्य शर्मिला येवले यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

यावर बीड जिल्ह्यात दिड दिवसाला एका शेतकऱ्याची आत्महत्या होते, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनिशलता कुठे असते? या प्रश्नावर `तुम्ही शेतकरी आत्महत्यांच्या आकड्याला केवळ शेतकरी लेबल लाऊन पाहू नका, त्याची इतरही कारणे आहेत.

तुम्ही वर्षभरातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा सांगत असला तरी मुख्यमंत्र्यांनी कारभार हाती घेऊन वर्षभर झालेले नाही, असेही येवले म्हणाल्या. यावर कुंडलिक खांडे यांनी सारवासारव करत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या मदतीचा उहापोह केला. शेतकऱ्यांसाठी देखील विविध मदत केल्याचे त्यांनी सांगीतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in