Beed : मुंदडांच्या लक्षवेधीनंतर पीआय मोरेंचे निलंबन, जायभायची बदली ..

या पोलिस ठाण्यात सामान्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, तर अवैध धंदे करणारांना सन्मान मिळतो, असा आरोप देखील त्यांनी केला. (Mla Namita Mundada)
Bjp Mla Namita Mundada News
Bjp Mla Namita Mundada NewsSarkarnama

बीड : भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाईचे पोलिस उपअधिक्षक आणि ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाच्या विरोधात लक्षवेधी मांडल्याने या दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गुरुवारी (ता.१८) विधानसभेत दिले. (Beed) पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे निलंबन व पोलिस उपअधीक्षक सुनील जायभाय यांची बदली करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाढते अवैध धंदे, बनावट दारू कारखान्यावर केलेली संशयास्पद कारवाई, पोलिसांच्या कारवाईतही मुद्देमाल सापडतो आणि दुसऱ्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईतही दोन लाखाचा मुद्देमाल सापडतो. (Namita Mundada) याचा अर्थ पोलिसांनी केलेल्या कारवाईत सर्व मुद्देमाल का जप्त झाला नाही, आणि जागा मालकही फरार असल्याचे दाखविले जाते.

पोलिसांनीच पकडलेला गुटखा कसा काय विक्री होतो, याच पोलिस ठाण्यांमध्ये लाचलुचपत विभागाच्या दोन कारवाया झाल्या, अशा अनेक तक्रारींचा पाढाच नमिता मुंदडा यांनी सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून वाचला. या पोलिस ठाण्यात सामान्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, तर अवैध धंदे करणारांना सन्मान मिळतो, असा आरोप देखील त्यांनी केला.

या सगळ्या प्रकारास पोलिस उपअधीक्षकांचे पाठबळ असू शकते, त्यामुळे या दोघांवरही कारवाई करावी, अशी मागणी मुंदडा यांनी विधानसभेत केली होती. याला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की आमदार मुंदडांनी वस्तुस्थिती मांडली आहे.

Bjp Mla Namita Mundada News
कृषीमंत्री मराठवाड्याचे, उपमुख्यमंत्री विदर्भाचे तरीही शेतकऱ्यांवर अन्याय का?

यात अनेक गोष्टी संशयास्पद आहेत. याचा रिपोर्टही प्राप्त झाला असून त्यात डिफाॅल्ट असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणात पोलिस निरीक्षक वासुदेव मोरेंचे निलंबन केले जाईल, तर पोलिस उपाधिक्षक सुनिल जायभाय यांची अकार्यकारी पदावर बदली करण्यात येईल, असे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com