Beed : विनायक मेटेंचा लक्षवेधी बॉम्ब; मुख्याधिकाऱ्यांसह सहा अधिकारी निलंबीत

शहरात पंधरा दिवसांनी पाणी येते, फिल्टर प्लांट नादुरुस्त असल्याने पिण्याचे पाणीही गढूळ येते, अनेक वसाहतींमध्ये वीज नाही, शहरातील पथदिवे महिनोन महिने बंद आहेत. (Mla Vinayak Mete)
Mla Vinayak Mete
Mla Vinayak MeteSarkarnama

बीड : बीड शहरातील नागरी प्रश्न व भौतिक सुविधांच्या अभावावरुन शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे (Mla Vinayak Mete) यांनी केलेल्या लक्षवेधीवरुन नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मेटे यांनी बीड (Beed) शहरातील विविध प्रश्नांवर नियम १०१ प्रमाणे केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सहा अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची घोषणा सोमवारी (ता. २१) सभागृहात केली. (Marathwada)

निलंबीत अधिकाऱ्यांमध्ये मुख्याधिकारी डॉ. उत्कृर्ष गुट्टे, जिल्हा नगर पालिका प्रशासन अधिकारी निता अंधारे, पाणी पुरवठा अभियंता राहूल टाकळे, कर अधीक्षक सुधीर जाधव, कनिष्ठ नगररचना सहाय्यक सलिम सय्यद याकूब व बांधकाम अभियंता योगेश हाडे यांचा समावेश आहे.

शहरात पंधरा दिवसांनी पाणी येते, फिल्टर प्लांट नादुरुस्त असल्याने पिण्याचे पाणीही गढूळ येते, अनेक वसाहतींमध्ये वीज नाही, शहरातील पथदिवे महिनोन महिने बंद आहेत, पथदिवे बंद असल्याने वाढलेल्या चोऱ्यांचे प्रकार, बेकायदेशिर नळ जोडण्या, कोरोना मृतांच्या अंत्यविधीच्या खर्चात भ्रष्टाचार, शहरातील कामे दर्जाहिन झाली आहेत.

Mla Vinayak Mete
Shivsena : अहो खाला, जरा थांबा! भाजप आमदार श्वेता महालेंना शिवसेनेचा टोला..

शहरातील अवैध बांधकामांना अभय, शहरातील रस्त्यांची देखभाल न केल्याने धुळीचे साम्राज्य, शहरात नियम स्वच्छता नसल्याने वाढलेली दुर्गंधी व यामुळे आरोग्याचे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी देऊनही मुख्याधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष अशा विविध मुद्द्यांवर विनायक मेटे यांनी लक्षवेधी मांडली. नगरपालिकेच्या अमृत योजना, रमाई आवास योजना, इतर कामांबाबत चौकशीचे आदेश देत वरील सहा अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची घोषणा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com