Beed Shivsena News : संजय राऊत बेशरम माणूस, रोज नवा वाद निर्माण करतो...

Maharashtra :संजय राऊत सत्ता गेल्यापासून सातत्याने मानसिक आजार बळावल्यासारखे वर्तन करत आहेत.
Beed Shivsena News
Beed Shivsena News Sarkarnama

Marathwada : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत बेशरम माणूस आहे. हा माणूस रोज एक नवा वाद निर्माण करतो. (Beed Shivsena News) यामुळे ठाकरे गटाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली आहे. संजय राऊत शिल्लक सेनेची पूर्णतः वाट लावल्याशिवाय थांबतील, असे वाटत नाही.

Beed Shivsena News
Omraje Nimbalkar On his Fathers memorial day : आमदार, खासदार झालो तरी राजेसाहेब, तुमचा मुलगा हीच माझी खरी ओळख..

संजय राऊतच (Sanjay Raut) तोंड म्हणजे एक घाणेरडं गटार असल्याची टिका शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केली. यापुढे त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, आमदारांबद्दल आक्षेपार्ह वर्तन किंवा विधान केले तर त्यांना खरंच जोडे मारले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री व खासदार शिंदे यांच्याबद्दल पत्रकारांच्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी केलेल्या प्रकाराबद्दल शनिवारी सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. (Beed Shivsena) यावेळी मुळूक म्हणाले, संजय राऊत सत्ता गेल्यापासून सातत्याने मानसिक आजार बळावल्यासारखे वर्तन करत आहेत. रोज उठून वाद निर्माण करणारे वक्तव्य करणे हा त्यांचा प्रमुख धंदा बनला आहे.

यापूर्वी राऊत यांच्या बेजबाबदारपणामुळे अनेकदा वाद निर्माण झाला असून त्यांना वेळोवेळी शिवसेनेने चोख उत्तर दिले आहे. यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेच्या पदाधिकारी, आमदारांबद्दल आक्षेपार्ह वर्तणूक, विधान केल्यास संजय राऊत यांना खरंच जोडे मारण्याचे काम शिवसैनिक करतील, असा इशाराही मुळूक यांनी दिला.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, युवासेना जिल्हाप्रमुख सुमीत कोळपे, पंचायत समितीचे माजी सदस्य गुंडीबा नवले, कृष्णा वांगीकर, देवीसिंह शिंदे, राकेश जाधव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com