Beed : रेखाताई क्षीरसागर यांना अखेरचा निरोप ; नवगण राजूरीत अंत्यसंस्कार..

अंत्यसंस्कारावेळी संदीप क्षीरसागर यांना आश्रु अनावर झाले. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जवळ घेऊन त्यांना धीर दिला. (Beed)
Beed : रेखाताई क्षीरसागर यांना अखेरचा निरोप ; नवगण राजूरीत अंत्यसंस्कार..
Beed NewsSarkarnama

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई व माजी सभापती तसेच गजानन सहकारी कारखान्याचे अध्यक्ष रविंद्र क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांच्या पत्नी रेखाताई क्षीरसागर यांना गुरुवारी (ता. २१) साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला.(Beed) त्यांचे मुळ गाव नवगण राजूरी येथील त्यांच्या मळ्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. (Marathwada)

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व नवगण राजूरीचे अनेक वर्षे सरपंचपद सांभाळणाऱ्या रेखा क्षीरसागर या धार्मिक वृत्तीच्या व मोकळ्या स्वभावाच्या म्हणून परिचित होत्या. त्यांनी अध्यात्मिक प्रसारासाठी जिल्हाभर स्वतंत्र काम केलेले आहे. त्यामुळे त्यांची जिल्हाभर ओळख होती. दरम्यान, ६५ वर्षीय रेखाताई क्षीरसागर यांना बुधवारी (ता. २०) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास ऱ्हदयविकाराच्या तिव्र धक्का बसला.

त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शहरातील नगर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. गुरुवारी नवगण राजूरी येथून फुलांनी सजविलेल्या वाहनातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी राजूरीसह जिल्हाभरातून आलेले हजारो लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले.

त्यानंतर त्यांच्या खालचा मळा या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांचे जेष्ठ पुत्र आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुखाअग्नी दिला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रेखाताई क्षीरसागर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार बाळासाहेब आजबे, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्रभारी पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार उपस्थित होते.

Beed News
कोल्हापूरात विरोधकांच्या तोंडाला फेस का आला? चंद्रकांतदादांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण

याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, रिपाईं युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार पृथ्वीराज साठे.

रमेश आडसकर, अॅड. शफीक सय्यद, रामकृष्ण बांगर, वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे, अक्षय मुंदडा, सुशीला मोराळे, सर्जेराव तांदळे, बाळासाहेब पिंगळे, बबन गवते, मदन जाधव आदी जिल्हाभरातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी कुटूंबातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, पती रवींद्र क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, पुत्र हेमंत क्षीरसागर आदींसह नातेवाईक उपस्थित होते. दरम्यान, अंत्यसंस्कारावेळी संदीप क्षीरसागर यांना आश्रु अनावर झाले. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जवळ घेऊन त्यांना धीर दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.