प्रवीण दरेकरांचा ताफा अडविणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल

विनायक मेटे यांच्या निमंत्रणावरून जिल्ह्यात आलेल्या दरेकर यांच्यावर मुंडे समर्थकांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रवीण दरेकरांचा ताफा अडविणाऱ्या मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल
Pankaja Munde, Pravin Darekarsarkarnama

बीड : विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांवर बीडच्या (beed) शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात 12 मुंडे समर्थकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Pankaja Munde latest news)

भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काल बीड जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी माजी आमदार विनायक मेटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर ते जात असतांना, बार्शी रोडवरील शिवाजी धांडेनगरच्या समोर काही मुंडे समर्थकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्यासह एका मुंडे समर्थकाला किरकोळ मार लागला होता.

तर या प्रकरणात आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 12 मुंडे समर्थकांवर बेकायदा गर्दी जमवून प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवल्या या आरोपावरून, कलम 341, 143, 110, 117, 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर डावलल्यामुळे संतप्त समर्थकांनी रविवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडय़ांचा ताफा चौसाळा आणि बीड शहरात अडवण्याचा प्रयत्न केला. आमदार विनायक मेटे यांच्या निमंत्रणावरून जिल्ह्यात आलेल्या दरेकर यांच्यावर मुंडे समर्थकांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Pankaja Munde, Pravin Darekar
नुपुर शर्मांना औरंगाबादच्या चौकात फाशी द्या, म्हणणाऱ्या जलीलांची आता सारवासारव

अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमासाठी विनायक मेटेंच्या निमंत्रणावरुन दरेकर रविवारी बीडमध्ये आले होते. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहातील कार्यक्रम संपून परत जात असताना धांडेनगरजवळ दरेकर यांच्या ताफ्यासमोर घोषणा देत कार्यकर्ते गाडय़ांसमोर आले. बीडकडे येत असताना चौसाळय़ाजवळही पंकजा मुंडे समर्थकांनी प्रवीण दरेकरांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी दरेकर यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थांबले नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in