Beed Politics : संदीप क्षीरसागर म्हणतात, 'त्यांना माजीच राहू द्या, पुढची वीस वर्षे मतदारसंघाचे मी बघतो!'

Sandeep Kshirsagar News : संदिप क्षीरसागरने काकांना डिवचलं..
Beed Politics : Sandeep Kshirsagar News :
Beed Politics : Sandeep Kshirsagar News : Sarkarnama

बीड : प्रस्थापित माजी मंत्री जर, माजी आमदार म्हणूनच शहराच्या विकासासाठी निधी आणत असतील तर त्यांनी यापुढे माजी म्हणूनच जिल्ह्यासह संपूर्ण देशाचा विकास करावा. बाकी बीड मतदार संघाचे पुढील २० वर्ष मी पाहतो, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लगावला.

मतदार संघातील विकास निधीवरुन नेहमी आमदार संदीप क्षीरसागर व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटांमध्ये आरोप - प्रत्यारोप आणि श्रेयवाद सुरु असतो. मधल्या काळात शहरातील नगरोत्थान सुवर्णजयंती योजनेतील रस्ते व नालींच्या कामांसाठीचा निधी व त्यानंतर राज्य शासनाकडून आलेल्या निधीवरुन असाच कलगीतुरा रंगला होता.

दरम्यान, आपण आमदार असतानाही कुठल्याही पदावर नसलेले मतदार संघात विकास कामांचे भूमीपुजन करत असल्याचा मुद्दा संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून अधिवेशनात उपस्थित केला होता. दरम्यान, मतदार संघातील घोडका राजुरी येथे नाबार्ड अंतर्गत एक कोटी २६ लाख रुपयांच्या कामाचे भुमिपुजन प्रसंगी संदीप क्षीरसागर बोलत होते.

Beed Politics : Sandeep Kshirsagar News :
Eknath Shinde | कोकणी माणूस धनुष्यबाणासोबत : ठाकरेंची सभा म्हणजे आपटीबार ; शिंदेचा हल्लाबोल!

संदीप क्षीरसागर म्हणाले, "प्रस्थापितांच्या भीतीमुळे विधानसभा निवडणुकीत माझ्या मागे एक पण कार्यकर्ता नव्हता. पण मतदारांनी मनातून आशिर्वाद दिले आणि प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून दिली. गेल्या पंचवीस वर्षापासून घोडका राजुरी येथील काठवडा नदीवरील पुलाचा प्रश्न प्रस्थापितांनी पूर्ण केला नाही. या पुला अभावी अनेक ग्रामस्थांना आपले जीव गमावावे लागले आहेत. "

"प्रस्थापितांचे हेच राजकारण त्यांना भावले असून, आज घोडका राजुरी येथील या पुलाचा प्रश्न माझ्या हातून मार्गे लागत आहे हे माझे मोठे भाग्य आहे. येणाऱ्या काळात परळी हायवे ते घोडका राजुरी हनुमान मंदिर हा मुख्य रस्ता, तर दलित बांधवांसाठी समाज मंदिर करण्याचा माझा मानस आहे. कोविडच्या काळामध्ये दोन वर्ष माझ्या आमदार फंडाचा एक रुपया सुद्धा मला मिळाला नाही. कारण - तो पैसा कोविड करता वापरला गेला. पण मागील एक दीड वर्षापासून बीड मतदारसंघात विशेषत बीड शहरात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून भूतो ना भविष्य ते असे सिमेंट रस्ते मी उभे केले आहेत, असेही ते म्हणाले.

Beed Politics : Sandeep Kshirsagar News :
Ramdas Kadam : सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला कुणाचे हॉटेल्स आहेत? रामदास कदमांनी भरसभेत सांगितलं...

"याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचे हे फलित आहे, म्हणूनच बीड मतदार संघाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत. पण प्रस्थापित माजी मंत्री आणि माजी आमदार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहेत. कुठलाही निधी आणला तरी मीच आणला असे ते म्हणतात. जर असे होत असेल तर तुम्ही माजी आमदारच राहून जिल्ह्याचा आणि देशाचा विकास करा. माझे मतदारसंघाचे पुढील २० वर्ष मी पाहतो, " असे ही संदीप क्षीरसागर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in