Beed : आमदार सावंतांच्या समर्थनात छावा रस्त्यावर ; वाहनांची तोडफोड

वाहनाच्या काचा फोडत एक मराठा लाख मराठा, तानाजी सावंत तुम आगे बढो, अखिल भारतीय छावा संघटनेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. (Beed News)
Chava Sanghtna Protest In Beed
Chava Sanghtna Protest In BeedSarkarnama

बीड : राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन आमदारांसह सुरुवातीला सुरत व आता गुहावटीत मुक्काम ठोकला आहे. (Beed) सध्या शिवसेना व बंडखोर आमदारांच्या समर्थकांत जुंपली आहे. रविवारी शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय छावा संघटना मैदानात उतरली. घोषणाबाजी करुन वाहनाची तोडफोडही करण्यात आली.

अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक रोमण यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले. (Shivsena) राज्यातील राजकीय घडमोडींचे पडसाद कायम जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवत असतात.

मात्र, यावेळी राज्यात मोठा राजकीय भूकंप होऊनही जिल्ह्यात हादरे बसण्यासाठी चार - पाच दिवसांचा कालावधी लागला. कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात आता शिवसेनेची ताकद काहीशी क्षीण आहे. जिल्ह्यात सध्या पक्षाचा एकही आमदार नाही आणि मोठी संस्था देखील पक्षाच्या ताब्यात नाही.

दरम्यान, शिवसेनेतील बंडखोरीनंतर बंडखोर आमदारांसह मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आणि घरांसमोर शिवसैनिक आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी राडेबाजीच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, बीडमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थकांनीही आंदोलन केले.

Chava Sanghtna Protest In Beed
Jalna : सत्तार, भुमरे दोघेही माझ्या संपर्कात...

वाहनाच्या काचा फोडत एक मराठा लाख मराठा, तानाजी सावंत तुम आगे बढो, अखिल भारतीय छावा संघटनेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, शनिवारीही एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी मुंडन आंदोलन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in