Beed News : ठाकरेंना पत्र लिहित युवासैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न..

Marathwada : विभागीय सचिवावर कामाचे पैसे न दिल्याने व वारंवार मागणी करूनही व्यवहाराची पूर्तता केली नसल्याचा आरोप.
Yuvasena Beed District News
Yuvasena Beed District NewsSarkarnama

Yuvasena : युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख अक्षय भुमकर यांनी बुधवारी (ता.२८) विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना (Yuvasena) प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात युवा सेनेच्या विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Yuvasena Beed District News
Winter Session : गायरान जमीन, कृषी महोत्सव वसुलीचे आरोप, तरीही सत्तारभाई एकदम ओक्के..

कंत्राटाच्या आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. अंबाजोगाईत हा प्रकार घडला असून अक्षय भुमकर यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Beed News) अक्षय भुमकर यांनी ठाकरे पितापुत्रांना पाठविलेल्या पत्रात युवा सेना विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्या जाचास कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. (Marathwada)

अक्षय भुमकर यांनी बुधवारी रात्री कंत्राटाच्या आर्थिक व्यवहारात विपुल बाळासाहेब पिंगळे यांनी येथील स्वाराती रुग्णालयातील ग्रंथालयाच्या संरक्षण भिंतीचे ३५ लाख रुपयांचे बांधकाम एकत्रित केले. कामाचे पैसे न दिल्याने व वारंवार मागणी करूनही व्यवहाराची पूर्तता केली नसल्याचा आरोप करून, या जाचास कंटाळून बुधवारी रात्री अक्षय यांनी विष प्राशन केले.

औषध प्राशन करण्यापूर्वी त्यांनी केलेल्या व्यवहाराचे सविस्तर पत्र समाज माध्यमावर टाकले होते. या घटनेची माहिती प्राप्त होताच शेजारच्या लोकांनी भूमकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. भूमकर यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असुन, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com