मोदींबाबतच्या 'त्या' विधानावर पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण ; म्हणाल्या..

Pankaja Munde : "सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पाहा, मतितार्थ लक्षात येईल...
BJP leader Pankaj Munde
BJP leader Pankaj MundeSarkarnama

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक विधान केले, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपचे नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता आपल्या या विधानावर पंकजा मुंडे (pankaja munde)यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (pankaja munde latest news)

"मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत" असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. यावर त्यांनी टि्वट करीत या भाषणांची लिंक शेअर केली आहे. “मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17 sep पासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. "सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पाहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या link वर आहेच... ” असे म्हणत मुंडे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे,

मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असून, यात मोदींबद्दल कुठलेही नकारात्मक उल्लेख केला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. काल मुंडे म्हणाल्या की, मी जर जनतेच्या मनात असेल, तर मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत'' असे खळबळजनक पंकजा मुंडे यांनी केले. पंकजांच्या या विधानावरून आता आश्चर्य व्यक्त केले जात असून नरेंद्र मोदींनी देशातील वंशवाद संपवला असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

BJP leader Pankaj Munde
PFI : पाच वर्षांच्या बंदीनंतर पीएफआयला NIAचा आणखी मोठा दणका

"मी आपल्या भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने ऊपस्थित बालकांच्या पिढीला चांगल्या राजकीय संस्कृतीची गरज सांगत असताना मोदीजींचा उल्लेख केला होता. त्यामुळे मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असुन, यात मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केलेला नाही. पंतप्रधान मोदीजींचा उल्लेख सर्वश्रेष्ठ रणधुरंधर राजकीय नेतृत्व या पद्धतीने केलेला आहे. तर “चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करु शकणार नाहीत" असा सकारात्मक संदर्भ यामागे असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com