Beed News : सुनबाईच 'बीड'च्या कारभारी; इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या महिला जिल्हाधिकारी !

Beed News : याआधी महिला जिल्हाधिकारी येता येता राहिल्या..
Beed News :
Beed News :sarkarnama

बीड : जसे देशाच्या इतिहासात आतापर्यंत इंदिरा गांधी एकमेव महिला पंतप्रधान ठरल्या, त्याचप्रमाणे आतापर्यंत बीड जिल्ह्याच्या इतिहासात एकमेव महिला जिल्हाधिकारी म्हणून दिपा मुधोळ - मुंडे यांना मान मिळाल्याचे, मावळते जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी म्हंटले आहे. तर, पहिली महिला जिल्हाधिकारी व जिल्ह्याची सून, असा दुहेरी आनंद असल्याचे दिपा मुधोळ - मुंडे यांनीही स्वागतावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची शासनाने औरंगाबाद सिडकोच्या प्रशासकपदी नेमणूक झाली. तर, त्यांच्या सिडकोच्या प्रशासक असलेल्या दिपा मुधोळ - मुंडे यांची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली. दिपा मुधोळ - मुंडे या कन्हेरवाडीच्या (ता. परळी) सून असून, त्यांचे पती विश्वास मुंडे कोल्हापूरचे आयकर आयुक्त आहेत. बुधवारी दिपा मुधोळ - मुंडे जिल्हाधिकारी पदाचा पदभार राधाबिनोद शर्मा यांच्याकडून स्विकारला.

Beed News :
Ravikant Tupkar : कितीही दडपा; आंदोलन सुरूच ठेऊ, पुढची लढाई आरपारची असेल...

दरम्यान, जिल्ह्याच्या इतिहासात आतापर्यंत साधारण ४० जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत प्रथमच दिपा मुधोळ - मुंडे या महिला आहेत. यापूर्वी प्रेरणा देशभ्रतार यांची जिल्हाधिकारी म्हणून झालेली नियुक्ती शासनानेच रद्द केली होती. त्यामुळे आता जिल्ह्याच्या कारभारी म्हणून जिल्ह्याच्या सुनबाई दिपा मुधोळ - मुंडे यांच्या हाती सुत्रे आली आहेत.

दिपा मुधोळ - मुंडे म्हणाल्या, "शासन धोरण-अजेंडा यानुसार पुढे काम सुरु राहील. चांगले काम करणाऱ्यांचे व चांगल्या सुचनांचे कायम स्वागतच असून, टाईमपास मात्र चालणार नाही, असेही त्यांनी सांगून टाकले. शासनाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याला प्राथमिकता असेल. त्याच बरोबर प्रशासन व जनतेमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, इतर मोहिमांबाबत आढावा घेऊन त्या पूर्ण केल्या जातील, असेही त्या म्हणाल्या. शासनाला सर्वाधिक विश्वास महसूलवरच असून, रिझल्ट देणारा हा एकमेव विभाग आहे.

नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अशा कुठल्याही कामांना महसूल पुढे असतो. यापुढे उपविभागीय अधिकाऱ्यांवरही जबाबदाऱ्या टाकल्या जातील. राधाबिनोद शर्मा म्हणाले, "मुलगी झाल्यानंतर एक लक्षात आले की एकदिवस ती लग्न होऊन जाणार आहे. त्यामुळे ती गेल्याचे दु:ख वाटू द्यायचे नाही, याची मनाशी तयारी केली. तसेच, 12 ऑगस्ट 2021 पासून रुजू झाल्यानंतर कधीही जावे लागू शकते, ही मानसिक तयारी ठेवली.

Beed News :
Supriya Sule : भिमाशंकरचा प्रश्न सुळेंनी मांडला; पण विश्वस्थ वळसे-आढळरावांच्या मौनाने आंबेगाव हळहळला !

बदलीचे दुःख नाही, पण बीड मधून जाण्याचे वाईट वाटते, असे सांगताना शर्मा भाऊक झाले व काही वेळ स्तब्ध राहीले. तुम्ही जसे त्यावर तुम्हाला वागणूक भेटते हे जिल्ह्यात काम करताना कळाले. जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्याची जबादारी महसूलची असल्याचे सांगून आपण जे काही केले ती आपली नोकरी व कर्तव्य होते, असेही राधाबिनोद शर्मा म्हणाले.

निरोप समारंभात सगळेच गोड गोड बोलतात, मात्र जिल्ह्याचे वातावरण देखील जीवनासारखे आहे. चढ - उतार येतात जातात. लोकशाही असल्याने लोकप्रतिनिधी बोलणारच, कामे सांगणारच. परंतु आपली बांधिलकी सामान्य लोकांशी हवी, माणुसकीने वागा, कामांना लागणारा वेळ कमी करण्याचे प्रयत्न करावेत, असेही राधाबिनोद शर्मा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com