Beed News : एडीट करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात बावनकुळे करणार कडक कारवाई!

Chandrashekhar Bawankule : पंकजा मुंडेंना बोलू दिले नसल्याचा व्हिडीओत दावा!
Chandrashekhar Bawankule :  Pankaja Munde
Chandrashekhar Bawankule : Pankaja MundeSarkarnama

Beed News : ‘‘पंकजा मुंडे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. मात्र, त्यांना भाजपमध्ये चुकीची वागणूक दिली जाते, असे काही लोक जाणीवपूर्वक प्रचार करीत आहेत. असाच प्रकार बीड जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २०) घडला. आमच्या दोघांमधील संवादाचा व्हिडिओ संपादित (एडीट) करून काही प्रसारमाध्यमांकडे पाठविण्‍यात आला. त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे निर्देश भाजपच्या जिल्हाध्यक्षांना दिले आहेत,’’ अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.

Chandrashekhar Bawankule :  Pankaja Munde
Thane News : नजीब मुल्ला आमदारकीचे 'परफेक्ट मटेरियल' : म्हस्केंच्या वक्तव्याची ठाण्यात चर्चा!

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी बावनकुळे कालपासून मराठवाडा दौऱ्‍यावर आहेत. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर शनिवारी ते येथे आले. पंकजा मुंडे आणि बावनकुळे यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा सुरू झाली.

Chandrashekhar Bawankule :  Pankaja Munde
Dombivali News : ठाकरे गटाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा खोडा : अखेर न्यायालयात बाजी जिंकली!

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, की पंकजा मुंडे या पक्षाच्या ज्येष्ठ, राष्ट्रीय नेत्या आहेत. राष्ट्रीय नेत्या असल्याने मी बोलल्यानंतर त्यांनी बोलावे, असे सांगून पंकजा मुंडे यांना मान दिला. प्रदेशाध्यक्ष असल्याने शेवटी बोलावे, असे पंकजा मला सांगत होत्या. एकमेकांना मान देण्याचाच तो प्रयत्न होता. तरीही या संभाषणाचा व्हिडिओ संपादित (एडीट) करून काही लोकांनी प्रसारमाध्यमांकडे पाठविला आणि ‘बोलू दिले नाही’, अशा आशयाचा चुकीचा अर्थ काढला. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये चुकीची वागणूक दिली जाते, असा जाणीवपूर्वक प्रचार काही लोक करीत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com