Beed : राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंची साखर कारखानदारीत पश्चिम महाराष्ट्रात कूच..

पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची बरोबरी इतर कुठलेच कारखाने करु शकत नाहीत असे नेहमी म्हटले जाते. (Beed News)
Ncp Leader Take Over Sugar Factory News, Beed
Ncp Leader Take Over Sugar Factory News, BeedSarkarnama

बीड : जिल्हा दुष्काळी आणि साखर कारखानदारीत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या कायम मागे अशी परिस्थिती आणि दुषणेही लागतात. (Beed) मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसेचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्ट्सने (Sugar Factory) साखर कारखानदारीत आता पश्चिम महाराष्ट्रात झेप घेतली आहे. बार्शी (जि. सोलापूर) येथील आर्यन शुगर हा कारखाना येडेश्वरी कारखान्याने विकत घेतला आहे.

राष्ट्रवादीचे (Ncp) माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दहा वर्षांपूर्वी केज तालुक्यात येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्ट्‌ कंपनीच्या माध्यमातून येडेश्वरी शुगर हा खासगी तत्वावरील साखर कारखाना सुरु केला. जिल्ह्यातील टॉप कारखान्यांमध्ये हा कारखाना आहे. यंदाही कारखान्याने आठ लाख मेट्रीक टनांहून अधिक ऊसाचे गाळप केले आहे. कारखान्याने इथेनॉल निर्मितीमध्येही पाऊल ठेवले आहे.

दरम्यान, त्यांच्या याच येडेश्वरी अॅग्रो प्रॉडक्टस कंपनीने बार्शी येथील आर्यन शुगर हा कारखाना विकत घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्र साखर कारखानदारीत पुढारलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची बरोबरी इतर कुठलेच कारखाने करु शकत नाहीत असे नेहमी म्हटले जाते. मराठवाड्यातील साखर कारखानदारी डबघाईला येण्यामागे दुष्काळासह व्यवस्थापनातील त्रुटीही असल्याचे सांगितले जाते.

Ncp Leader Take Over Sugar Factory News, Beed
Aimim : तुमची खुर्ची अन् पक्षापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे, बोलतांना सांभाळून..

मात्र, दहा वर्षांपासून येडेश्वरी यशस्वी चालवून आता बजरंग सोनवणे यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारीकडे कुच केले आहे. आर्यन शुगर खरेदीची सर्व तांत्रिक व आर्थिक प्रक्रिया पुर्ण झाली. बजरंग सोनवणे यांनी कारखाना हस्तांतरणाची कागदपत्रे स्वत: स्विकारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in