Beed Ncp : `सांगा बाप्पांचे काय चुकले` : बजरंग सोनवणे समर्थकांची नाराजी

सध्याही ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण आणि आरोग्य समितीचे सभापती, येडेश्वरी शुगर या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. (Beed Ncp)
Bajarang Sonawane, Ncp Beed
Bajarang Sonawane, Ncp BeedSarkarnama

बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीची दोन दिवसांपूर्वी खांदेपालट होऊन अध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची निवड झाली. (Ncp) त्यानंतर तत्कालिन बजरंग जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे समर्थकांनी सोशल मिडीयावरुन नाराजी व्यक्त केली आहे. (Beed) पक्षासाठी केलेल्या कामांची यादी टाकून ‘सांगा बप्पांचे काय चुकले? असा सवाल समर्थक करत आहेत. (Marathwada)

विशेष म्हणजे पक्षाच्या सोशल मिडीया प्रमुखांची ‘सगळेच खुश’अशी पोस्ट अनेकार्थी आहे. बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणे यांना दोन टर्म जिल्हाध्यक्षपदावर संधी दिली. चार वर्षे आठ महिने म्हणजे दुसरी टर्म संपल्यानंतरही आठ महिने अधिक काळ ते पदावर होते.

दोन दिवसांपूर्वी राजेश्वर चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आली. त्यानंतर बजरंग सोनवणे समर्थकांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करुन दिली आहे. या नाराजीत पक्षाचे सोशल मिडीया प्रमुखांनीही उडी घेत ‘सगळेच खुश’अशी पोस्ट केली आहे.

‘बजरंग बाप्पा चे चुकले काय ?’अशी विचारणा करणाऱ्या पोस्टमध्ये त्यांनी पक्षासाठी काय योगदान दिले त्याचा उहापोह केला आहे. सुरेश धस यांनी पक्ष सोडल्यानंतर आष्टी तालुक्यात पक्षवाढविण्यासाठी काम केल्यानेच तिथे राष्ट्रवादीचा आमदार विजयी झाला. पक्षाचे जिल्हास्तरावर मोर्चे आयोजित केले.

शेतकरी पुत्र म्हणून राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविली, या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळेच विधानसभेला पक्षाचे चार आमदार विजयी झाले, तसेच विरोधकांच्या ताब्यातील जिल्हा परिषद पक्षाच्या ताब्यात आणून दिली.

Bajarang Sonawane, Ncp Beed
छत्रपती संभाजी राजेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तरुणाचे जलकुंभावर उपोषण

पक्षासाठी आहोरात्र झटलात, हेच तुमचे चुकले, प्रस्थापितांच्या घरी जन्म घेण्याऐवजी गरीबाच्या घरी जन्म घेतला हे चुकले असे शल्यही यात व्यक्त केले आहे. चार वर्षे आठ जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली मात्र पक्षाने काय दिले, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, बजरंग सोनवणे यांची राजकीय कादकिर्द दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांचे समर्थक म्हणून पंचायत समिती उपसभापतीपदावरुन सुरु झाली. नंतर जिल्हा परिषद सदस्य व विविध समित्यांचे सभापती म्हणून त्यांनी काम केले. सध्याही ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण आणि आरोग्य समितीचे सभापती, येडेश्वरी शुगर या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com