Beed : नवनीत राणाने मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट बोलू नये, आम्ही तुम्हाला सरळ करू शकतो..

आमच्या दैवताबद्दल ती काही बोलली तर आम्ही ते कसे सहन करणार. ती बाई कोण आहे, कशी आहे हे सगळ्यांना माहित आहे. (Chandrakant Khaire)
Chadrakant Khaire on Navneet Rana, Chadrakant Khaire Latest News in Marathi, Navneet Rana News
Chadrakant Khaire on Navneet Rana, Chadrakant Khaire Latest News in Marathi, Navneet Rana NewsSarkarnama

बीड : नवनीत राणा ही बाई आहे का कोण आहे ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ती काहीही बोलते. तुम्ही मला तिच्याबद्दल काही विचारू नका, मी बोललो की मग ते सगळं व्हायरल होतं. (Beed) शिवसैनिकाच्या डोक्यात राग गेला की त्यांची अक्कल गुडघ्यात जाते. मग आम्ही काही करू शकतो. तेव्हा नवनीत राणाने मुख्यमंत्र्यांबद्दल काही बोलू नये, अन्यथा आम्ही तिला सरळ करू शकतो, अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chadrakant Khaire) यांनी नवनीत राणा यांना दम भरला. (Chadrakant Khaire Latest News in Marathi)

बीड येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीला चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीनंतर प्रसार माध्यमांनी खैरे यांना खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणत्याही मतदारसंघातून माझ्या विरोधात निवडूक लढवून दाखवा असे आव्हान दिले, त्याबद्दल प्रश्न विचारला. (Shivsena)

यावर भडकलेल्या खैरे यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत आम्ही तुम्हाला सरळ करू शकतो, असा इशारा दिला. चंद्रकांत खैरे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या राज्याचा कारभार उत्तमपणे सांभाळत आहे. असे असतांना ही बाई त्यांच्याबद्दल काहीही बोलते. ही बाई आहे की कोण ? मी तिच्याबद्दल काही बोललो की पुन्हा ते व्हायरल होईल. आम्हा शिवसैनिकांचा राग डोक्यात गेला की आमची अक्कल गुडघ्यात येते, मग आम्ही काहीही करू शकतो, तिला सरळ करू शकतो.

Chadrakant Khaire on Navneet Rana, Chadrakant Khaire Latest News in Marathi, Navneet Rana News
Aimim : आ रहा हूं औरंगाबाद ; अकबरुद्दीन ओवेसी १२ मे रोजी शहरात..

आमच्या दैवताबद्दल ती काही बोलली तर आम्ही ते कसे सहन करणार. ती बाई कोण आहे, कशी आहे हे सगळ्यांना माहित आहे, असेही खैरे म्हणाले. जातीचे खोटे प्रमाणपत्र, पक्ष बदलणारी ती बाई आहे. आधी राष्ट्रवादीचा तिला सपोर्ट होता, आता भाजपचा आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यावर टीका करतांना भाजपची पातळी घसरत चालली असल्याची टीकाही खैरे यांनी केली.

आमचे जुने मित्र आहेत, माजी मुख्यमंत्री ते फक्त भाषण करतात, ते बुद्धिजीवी आहेत, असे म्हणत खैरेंनी फडणवीसांना टोला लगावला. उद्धव साहेबांना शांतपणे कार्य करू द्या. महाराष्ट्र एक नंबरवर आणण्याचा साहेबांचा प्रयत्न आहे. मात्र या कामात देखील खोडा घालण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जातात. लोकांची दिशाभूल करण्याचे काम देखील फडणवीस करत असल्याचा आरोप खैरे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com