Beed : गरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी ज्योती मेटेंना आमदार करा ; संभाजीराजेंची मागणी

भविष्यात आपल्याला कसलीही मदत लागली तर मी मेटे कुटुंबीया सोबत उभा असेल असा विश्वास त्यांनी डॉ. ज्योती मेटे , रामहरी मेटे, मुलगा अशितोष मेटे यांना दिला. (Chhatrapati Sambhajiraje)
Chhatrapati Sambhaji Raje Visit Mete Family In Beed News
Chhatrapati Sambhaji Raje Visit Mete Family In Beed NewsSarkarnama

बीड : छत्रपती संभाजी राजे यांनी आज स्व. विनायक मेटे यांच्या बीड येथील निवासस्थानी भेट देत मेटे कुटुंबियांचे सांत्वन केले. (Beed) यावेळी मराठा समाज आणि शिवसंग्राम पक्ष व संघटनेला टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी डॉ. ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी केली.

मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळाले पाहिजे. तसेच राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोट्यातून आमदारकी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणाच्या बैठकीला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात होवून त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. एक प्रकारे ते समाजाच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि समाज प्रश्नांवर शहीद झाले अशी भावना आता समजा बांधावामध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने मेटे कुटुंबीयांसह शिवसंग्राम आणि मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो, अशा शब्दात संभाजीराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Chhatrapati Sambhaji Raje Visit Mete Family In Beed News
'वर्षा बंगल्यावर शपथ घेणारे गुलाबराव पाटील दुसऱ्या दिवशीच गुवाहाटीला पळून गेले!'

मेटे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेत भविष्यात आपल्याला कसलीही मदत लागली तर मी मेटे कुटुंबीया सोबत उभा असेल असा विश्वास त्यांनी डॉ. ज्योती मेटे , रामहरी मेटे, मुलगा अशितोष मेटे यांना दिला. त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना देखील राजेंनी या भेटीप्रसंगी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com