Kshirsagar-Solanke-Mundada
Kshirsagar-Solanke-MundadaSarkarnama

Beed : आमदारांकडूनच कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे ; पोलिस अधिक्षक सक्तीच्या रजेवर..

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा महत्वाचा आणि गंभीर आहे, त्यामुळे लवकरच बीड जिल्ह्यातील आमदारांची एकत्र बैठक घेणार असल्याचे पाटील यांनी सभागृहात सांगितले. (Beed News)

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून केवळ विरोधी पक्षच नाही, तर जिल्ह्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी देखील आवाज उठवला आहे. (Beed) जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, (Sandip Kshirsagar) आजबे भाजपच्या नमिता मुदंडा या सर्वांनीच विधानसभेत जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे उदाहरणासह वाभाडे काढले.(Marathwada)

पोलिस अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप करत कारवाईची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बीडच्या पोलिस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा सभागृहात केली. पंधरा दिवसात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन देखील गृहमंत्र्यांनी लक्षवेधीच्या चर्चेला उत्तर देतांना दिले.

बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अनेक धक्कादायक आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडल्या. गोळीबारा सारख्या प्रकाराने तर अख्खे बीड हादरून गेले. गुटखा, वाळू, मटका, जुगार, महिलांवरील अत्याचार, पोलिसांचा धाक नसणे अशा असंख्य आरोपांनी जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंदवडे निघाले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पकंजा मुंडे यांनी नुकतेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवून जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवण्याची मागणी केली होती.

परंतु केवळ विरोधी पक्षच नाही तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील कायदा व सुव्यवस्थेवर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवत गृहमंत्र्यांना जाब विचारला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी अनेक उदाहरणे देत जिल्ह्यातील सुस्त पोलिस प्रशासन आणि त्यामुळे बोकाळलेली गुन्हेगारी, दहशत याचा पाढाच वाचला.

भाजपच्या केजच्या आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या, बीडमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नाही. माझासमोर मतदारसंघातील धाब्यावर दारू विक्री सुरू होती. दुपारी चार वाजता एका रसंवतीवर थांबले तेव्हा दारू पिलेले काहीजण माझ्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरत होते. जर माझ्या सारखी महिलाच सुरक्षित नसेल तर मग इतरांचे काय? या प्रकरणात तक्रार झाली पण पोलिस काहीही करत नाहीत.

केवळ हाच प्रकार नाही तर जिल्ह्यात गुन्हेगारी घटना, महिलांवरील अत्याचार, शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, अवेध वाळू, गुटखा विक्रीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे या सगळ्याला जबादार असलेल्या पोलिस अधिक्षकांची तातडीने उचलबांगडी केली पाहिजे, अशी मागणी मुदंडा यांनी सभागृहात केली. बीडचा बिहार झाल्याचे बोलले जातेय, असे सांगत गोळीबाराच्या घटनेनंतर तर बीडकर जीव मुठीत घेऊन वावरत असल्याचे त्यांनी सांगितले.

Kshirsagar-Solanke-Mundada
शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांविरोधात निषेधाचा ठराव..

मटका, गुटखा सगळेच सुरू..

आमदार प्रकाश सोळुंके यांनी कायदा व सुव्यवस्थेवरील लक्षवेधीवर बोलतांना जिल्ह्यात गुटखा, मटका सगळेच सुरू असल्याचे सांगितले. दरोडे, चोऱ्या वाढल्या आहेत, निष्पाप नागरीकांचे बळी जात आहेत. वाळू उत्खननात चार निष्पाप बालकांचा ट्रकने चिरडल्यामुळे मृत्यू झाला याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. पोलिस खात्याच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप आहेत, पोलिस अधिक्षकच हप्ते खातात अशा प्रकारच्या आरोपांकडे देखील सोळंके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सट्टा सुरू असल्याचा आरोप केला. मटका, क्रिकेट सट्टा, वेश्या व्यवसाय सुरू आहे. लोकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. अवैध व्याजबट्याचा व्यवसाय देखील तेजीने सुरू आहे. क्रिकेटवर सट्टा लावण्यासाठी व्याजाने पैसे दिले जातात, त्यानंतर ते वसुल करण्यासाठी कोण कधी घरी येईल याची भिती देखील अनेकांच्या मनात असते.

विशेष म्हणजे हे जे रॅकेट चालवतात ते मतदारसंघातीलच लोक असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला. या लोकांना पाठीशी कोण घालत आहे? त्यांच्यावर कारवाई कधी करणार ? एसपी बाबत तक्रार देऊन कारवाई का होत नाही? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. यावर सर्व लोकप्रतिनिंधीचे ऐकूण घेतल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बीडच्या पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती सभागृहात दिली.

वळसे पाटील म्हणाले, बीडमध्ये गोळीबाराची जी घटना घडली त्यात संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती भांडणातून हा प्रकार घडला होता, पोलिस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा महत्वाचा आणि गंभीर आहे, त्यामुळे लवकरच बीड जिल्ह्यातील आमदारांची एकत्र बैठक घेणार असल्याचे पाटील यांनी सभागृहात सांगितले.

या शिवाय सदस्यांनी केलेल्या प्रत्येक तक्रार आणि आरोपांची मी माहिती घेऊन कठोरात कठोर कारवाई करेन, असा शब्द देखील त्यांनी सभागृहात दिला. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात आपण पंधरा दिवसात अहवाल मागितला आहे, तो आल्यावर निश्चितच संबंधितांवर कारवाई केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com