Beed : शिंदेंच्या जवळ वाटणारे क्षीरसागर भाजपमध्ये जाऊ शकतात..

भविष्यातील राजकीय घटना कायम अनिश्चित असल्या तरी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश त्यांच्यासाठी व भाजपसाठीही सोयीचा असल्याचे मानले जाते.(Beed News)
Jaydatta Kshirsagar Political News, Beed
Jaydatta Kshirsagar Political News, BeedSarkarnama

बीड : अनेक दिवसांपासून शिवसेनेपासून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुरक्षित अंतरावर असणाऱ्या क्षीरसागरांशी पक्षाने संबंध तोडल्याची घोषणा केल्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर कोणत्या पक्षात जाणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. रस्ता कामांच्या उद॒घाटन कार्यक्रमावेळी क्षीरसागर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळ वाटत असले तरी त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून बॅकअप दिले जात असल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

Jaydatta Kshirsagar Political News, Beed
Sanjay Shirsat : प्रकृती बरी नसतांना उद्धव ठाकरेंना बोलवायला नको होते..

सद्य परिस्थितीत क्षीरसागर बंधू आता कोणत्या पक्षात जाणार यावर खलबते सुरु आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अगोदरच सोडलेली आहे. (Beed) थेट मोठ्या पवारांवरील टिका व मतदार संघातील विद्यमान आमदारच त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीत असल्याने ते राष्ट्रवादीत जाणार नाहीत हे निश्चित आहे. (Jaydatta Kshirsagar) राज्यात सध्या भाजप - शिवसेनेची सत्ता आहे, पुर्वीच्या युतीत मतदार संघ शिवसेनेचा असल्याने आताही तो आताच्या युतीत शिवसेनेला (बाळासाहेब ठाकरे) मिळेल म्हणून ते शिवसेनेत जातील, अशी अटकळ बांधली जात आहे.

त्यात नगरविकास खाते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून भविष्यात नगर पालिकेला निधी मिळण्यासाठी व सध्या हाती घेतलेल्या रस्ता कामांसाठी निधीही त्यांना तेव्हा नगरविकास मंत्री असलेल्या शिंदे यांनीच दिल्याने क्षीरसागर बंधू शिवसेनेत जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्यांची पावले भाजपच्या वाटेवर असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

Jaydatta Kshirsagar Political News, Beed
Marathwada : तुम्ही मदत जाहीर करा, आम्ही दौरे बंद करतो; उद्धवसेनेचे सरकारला आव्हान..

भविष्यातील राजकीय घटना कायम अनिश्चित असल्या तरी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचा भाजप प्रवेश त्यांच्यासाठी व भाजपसाठीही सोयीचा असल्याचे मानले जाते. या समिकरणामुळे क्षीरसागरांना उत्तम राजकीय प्लॅटफॉर्म मिळेल. तर, मतदार संघात भाजपलाही ताकदीचे नेते मिळण्यास मदत होईल, असे दुहेरी गणित जुळत असल्याने असेच समिकरण घडू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

राष्ट्रवादीत आमदार असूनही बंड करणाऱ्या पुतण्याला त्यांचे पक्षांतर्गत विरोधक बळ देत होते म्हणून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी थेट भाजपचा प्रचार केला. पक्षांतर करुन प्रवेश मात्र शिवसेनेत केला. मात्र, त्याकाळी युतीत बीडची जागा शिवसेनेला असल्याने फडणवीस - ठाकरे यांच्या अंडरस्टँडींगनेच क्षीरसागरांनी शिवबंधन बांधले असल्याचे सांगीतले जात होते.

आता जरी परवाच्या उद॒घाटन कार्यक्रमात पुढे मुख्यमंत्री शिंदे असले तरी क्षीरसागरांना बॅकअप उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून असल्याचे सांगीतले जात आहे.राज्यातील नव्या युतीत तुलनेने भाजपपेक्षा निम्मे आमदार असूनही शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्रीपद व निम्मी मंत्रीपदे दिली आहे. भविष्यातील भाजपची राज्यातील वाट सुकर करण्यासाठीचाच हा फॉर्म्युला असल्याचे सांगीतले जात आहे. त्या फॉर्म्युल्यात बीडची जागा क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे भाजपला सुटू शकते, असेही जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, मतदार संघात व विशेषत: बीड शहरात भाजपला मानणारा मतदार आहे. मात्र, भाजपला मतदार संघात तगडा चेहरा नसल्याने मागच्या अनेक निवडणुकांत नगर पालिका किंवा जिल्हा परिषदेत म्हणावे तेढवे यश मिळालेले नाही. अलिकडच्या काळात भाजपने २०१४ ची विधानसभेची एकमेव निवडणुक लढविली. त्यावेळी पक्षाने दिवंगत विनायकराव मेटे यांना उमेदवारी दिली होती. मतदार संघात पुर्णवेळ नसणे व मुळ भाजपनेच अंग काढल्याने त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले.

त्यामुळे क्षीरसागरांसारखा यंत्रणा, कार्यकर्त्यांचे जाळे व अनुभव असलेला चेहरा आपल्याकडे असावा असे वरिष्ठ भाजप नेत्यांचे प्रयत्न आहेत. त्यांच्यामुळे नगर पालिका व इतर स्थानिक निवडणुकांतही भाजपला फायदा होईल, असे गणित मांडले जात आहे. तसे, क्षीरसागरांचे पक्षांतर नगर पालिका निवडणुकीनंतरच होणार असल्याचे सांगीतले जात आहे.

तर, शहरातील भाजपला माणणारा वर्ग व ग्रामीण भागातील भाजपची ताकद क्षीरसागरांसाठी देखील उत्तम राजकीय प्लॅटफॉर्म ठरणार आहे. पालिका हद्दीतील आपली ताकद आघाडीच्या माध्यमातून सिद्ध करुन ते पुढची दिशा ठरविणार असल्याचे बोलले जात आहे. आता घडणार काहीही असले तरी क्षीरसागरांचा भाजप प्रवेश हा त्यांच्यासाठी व भाजपसाठीही सोयीचा असल्याचे गणित मांडले जात आहे.

बीड मतदार संघात भाजपला आतापर्यंत ताकदीचा नेता भेटला नाही. पूर्वी भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांची क्षीरसागरांशी असलेली छुप्या युतीमुळे बीडमध्ये भाजपने कधीही पक्षवाढीसाठी प्रयत्नही केले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसांना भविष्यातील भाजपसाठी बीडमध्ये पक्षाचा ताकदीचा नेता असावा असे वाटत असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com