Beed : गोळीबार प्रकरणात क्षीरसागर पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मंगळवारी (ता. १९) आयोजित कार्यक्रम, रुग्ण यामुळे चार दिवस अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयाला केला. तो अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. (Beed)
Dr.Bharatbhushan Kshirsagar-Yogesh Kshirsagar
Dr.Bharatbhushan Kshirsagar-Yogesh KshirsagarSarkarnama

बीड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबार व दरोड्याच्या गुन्हा प्रकरणात बीडचे (Beed) माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ.योगेश क्षीरसागर यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. (Marathwada)

जमिनीच्या वादातून दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या मुद्रांक कार्यालयाच्या आवारात दोन गटांत हाणामारी होऊन गोळीबाराची घटना घडली होती. (Maharashtra)

या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादींवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, दरोडा अशा कलमांखाली गुन्हे नोंद झाले. यातील एका गुन्ह्यात माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांचाही समावेश आहे.

Dr.Bharatbhushan Kshirsagar-Yogesh Kshirsagar
Chikhlikar : दहा कोटींच्या खंडणीसाठी मलाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते..

दरम्यान, त्यांचा जामीन सोमवारीच (ता. १८) जिल्हा न्यायाधीश (पाचवे) सत्यवान डोके यांनी फेटाळला होता. यानंतर पुन्हा त्यांनी मंगळवारी (ता. १९) आयोजित कार्यक्रम, रुग्ण यामुळे चार दिवस अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयाला केला. तो अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com