Beed : वीस हजारांच्या मताधिक्याने निवडून देणाऱ्या परळीकरांचे समाधान हे माझे कर्तव्यच..

आगामी काळातील निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थान अधिक मजबूत व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण केलेली व करत असलेली कामे घेऊन जनतेत जाण्याची गरज. (NCP)
Beed : वीस हजारांच्या मताधिक्याने निवडून देणाऱ्या परळीकरांचे समाधान हे माझे कर्तव्यच..
Guardian Minister Dhnanjay MundeSarkarnama

बीड : विधानसभा निवडणुकीत परळीच्या जनतेने मला वीस हजारांचे मताधिक्य मिळवून देत विजयी केले, शहरातील प्रत्येक नागरिक, कार्यकर्त्याचे समाधान करणे, त्यांच्या कामी येणे हे मी माझे कर्तव्य समजतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी परळीकरांबद्दल कृतज्ञा व्यक्त केली. (Parali) परळी शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आढावा बैठकीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बहिणी विरुद्ध झालेल्या लढतीत धनंजय मुंडे यांनी परळीमधून वीस हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. (Beed) या विजयाची चर्चा राज्यभरात झाली होती. (Marathwada) याची आठवण धनंजय मुंडे यांनी आढावा बैठकीच्या निमित्ताने काढली.

या बैठकीच्या निमित्ताने बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, परळी शहरची आढावा बैठक घेतली, विधानसभा निवडणुकीत २० हजारांचे मताधिक्य देणाऱ्या परळी शहरातील नागरिक व कार्यकर्ते-सहकारी या प्रत्येकाचे समाधान करणे, त्यांच्या कामी येणे मी माझे कर्तव्य समजतो. त्यादृष्टीने लवकरच घरोघरी जाऊन संवाद साधण्याचे अभियान सुरू करणार आहे.

Guardian Minister Dhnanjay Munde
संजय राऊत जे बोलतात, ते कधी सत्य ठरले आहे का?

आगामी काळातील निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थान अधिक मजबूत व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण केलेली व करत असलेली कामे घेऊन जनतेत जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी उपस्थितीत सहकारी-पदाधिकाऱ्यांना आवर्जून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.