Beed : शिल्लक ऊसाला एकरी लाखाची मदत द्या; आमदार नमिता मुंदडांचे धरणे

शिल्लक असलेला ऊस तात्काळ हार्वेस्टर मशीनने कारखान्याला नेण्यात यावा, शिल्लक ऊसाचे पंचनामे करून शासनाने एकरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी. (Mla Namita Mundada)
Bjp Mla Namita Mundada
Bjp Mla Namita MundadaSarkarnama

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील गाळपाअभावी शेतात उभ्या असलेल्या उसाच्या बाबतीत सरकार काहीच उपाययोजना करित नसल्याचा आरोप भाजप आमदार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी केला. या प्रश्नावर मुंदडा यांनी शनिवारी (ता. ३०) अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शिल्लक ऊसाचे पंचनामे करुन एकरी एक लाख रुपये मदत द्या, अशी मागणी त्यांनी केली.

उसाची लागवड करून १६ महिने उलटले तरी ऊस कारखान्याला जात नाही. (Sugercan) यामुळे शेतकऱ्यांना कारखान्यावर चकरा माराव्या लागतात, तरीही उसासाठी वाहन मिळत नाही, वाहन मिळाले तर मजूर मिळत नाहीत. (Beed) मजूर एकरी आठ ते १० हजार रुपये मजुरी मागतात. या फेऱ्यात सध्या शेतकरी अडकला आहे. आता तर जागेवरच उस वाळुन जात असल्याने शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झाली आहे.

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत व आधार देण्याची गरज आहे. शिल्लक असलेला ऊस तात्काळ हार्वेस्टर मशीनने कारखान्याला नेण्यात यावा, शिल्लक ऊसाचे पंचनामे करून शासनाने एकरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी करत नमिता मुंदडा सकाळी ११ वाजेपासून धरणे आंदोलन करत आहेत.

Bjp Mla Namita Mundada
AIMIM : इम्तियाज जलील यांच्या `इफ्तार` पार्टीला ओवेसींची हजेरी..

आंदोलनात ज्येष्ठनेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, अच्युत गंगणे, भगवान केदार, मधुकर काचगुंडे, अनंत लोमटे, सुनिल लोमटे, शामराव आपेट, डॉ. वासुदेव नेहरकर, डॉ.अतुल देशपांडे, दिलीप काळे, ज्ञानेश्वर चौरे, हिंदुलाल काकडे, सुरेश कराड, कमलाकर कोपले, संजय गंभीरे, गणेश कराड, आनंत आरसुडे, बळीराम चोपणे, दिलीप भिसे, आंकुशराव इंगळे, ऋषीकेश आडसकर, सुदाम पाटील, अनिरुद्ध शिंदे, अंगद मुळे, शरद इंगळे आदी सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com