Beed : ज्योती मेटेंना राज्यपाल नियुक्त सदस्यपदी संधी द्या ; शिवसंग्रामची मागणी

राज्यातील सत्तातंरानंतर मेटे यांना सरकारमध्ये विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार होती, असा दावा शिवसंग्रामकडून केला जातोय. (Beed News)
Shivsangram Sanghtana News, Beed
Shivsangram Sanghtana News, BeedSarkarnama

बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थीत केल्या जात आहेत. (Beed) बीडमध्ये मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर या अपघाताबद्दल अधिक चर्चा होत आहे.

मेटे यांच्या पत्नी ज्योती यांनी देखील अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थिती केले होते. असे असतांना आता शिवसंग्राम संघटनेकडून ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी पुढे आली आहे. आष्टी येथे (Vinayak Mete) विनायक मेटे यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली.(Marathwada)

यावेळी स्व. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यपाल नियुक्त आमदार करावं आणि सरकारमध्ये सामील करून घ्याव, अशी मागणी शिवसंग्रामचे आष्टी येथील तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे. मेटे साहेब मला १२ तारखेला भेटले होते, तेव्हा ते बोलले होते की आपल्याला दुसऱ्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल.

त्यामुळे आता साहेब राहिले नाहीत, तेव्हा ज्योती ताईला आमदार करून सरकारमध्ये सामील करून घ्यावे, अशी आमची मागणी असल्याचे चौधरी म्हणाले. विनायक मेटे यांचा सर्व पक्षातील नेत्यांशी संपर्क होता. शिवसंग्रामच्या माध्यमातून राजकारण करत असतांना त्यांनी भाजप, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसोबत जात पाचवेळा विधान परिषदेवर संधी मिळवली होती.

भाजपने मेटे यांच्यावर फडणवीस सरकार असतांना महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मराठा आरक्षणासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील होऊ घातलेल्या भव्य स्मारक समितीत देखील मेटे होते. राज्यातील सत्तातंरानंतर मेटे यांना सरकारमध्ये विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळणार होती, असा दावा शिवसंग्रामकडून केला जातोय.

Shivsangram Sanghtana News, Beed
Santosh Danve : दोन मुली असल्याने लोक फोन करून विचारतात, भाऊ आता कसं..

मुंबईत झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस, चंद्रकांत पाटील यांनी विनायक मेटेंना सरप्राईज गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले होते. परंतु एका दुर्दैवी अपघातात मेटेंचे निधन झाले आणि राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली.

मेटेंना मिळणारी संधी आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना देण्यात यावी. राज्यपाल नियुक्त सदस्यपदी त्यांना घेऊन सरकारमध्ये सहभागी करून घ्यावे, अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com