Beed : विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

नगर रोडवरील शिवसंग्राम भवन येथे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा निघून साडेतीन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. (Vinayak Mete)
Vinayak Mete News, Beed
Vinayak Mete News, BeedSarkarnama

बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्यावर सोमवारी (ता. १५) दुपारी साडे तीन वाजता शहरातील कॅनाल रोड (रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Beed)

मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला जाताना विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या वाहनाला मुंबईजवळ अपघात होऊन यात त्यांचा मृत्यू झाला. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात त्यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. (Marathwada) त्यानंतर वडाळा (मुंबई) येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

यानंतर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात पार्थिवावर काही औषधीक प्रक्रीया करुन रुग्णवाहिकेने त्यांचे पार्थिव पाच वाजता बीडकडे रवाना झाले. मुंबईत पाऊस असल्याने एअर लिफ्ट होऊ न शकल्याने रुग्णवाहिकेने येण्याचा ऐनवेळी निर्णय झाला.

दरम्यान, रात्री उशिरा त्यांचे पार्थिव त्यांच्या स्वराज्य नगर भागातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर नगर रोडवरील शिवसंग्राम भवन येथे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा निघून साडेतीन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

Vinayak Mete News, Beed
Beed : विधान परिषदचे रेकॉर्ड झाले, पण मेटेंचे मंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच राहीले..

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर भाजप पक्षासोबत राहीलेल्या विनायक मेटे तब्बल पाच वेळा विधान परिषद सदस्य राहीले आहेत. सर्वाधिक काळ वरच्या सभागृहाचे सदस्य राहीलेले विनायक मेटे राज्यातील एकमेव आहेत हे विशेष. कळंब येथे माध्यमिक शिक्षण घेताना त्यांनी पोटापाण्यासाठी इमारतीला रंग देण्याचे काम केले.

शिक्षण सोडून त्यांनी शेतीही केली. नंतर घरच्यांच्या परस्पर त्यांनी पुन्हा नववीला प्रवेश घेतला आणि रोज पाच किलोमिटर अंतर कापत दहावी पूर्ण केली. तारुण्यात त्यांनी मुंबई गाठली व पोटापाण्यासाठी भिवंडी येथे त्यांनी काही काळ भाजी विक्रीचाही व्यवसाय केला. याच काळात त्यांनी दिवंगत किसनराव वरखिंडे यांच्यासोबत मराठा महासंघाचे काम सुरु केले.

१९९४ च्या निवडणुकीत मराठा महासंघ भाजपसोबत होता. राज्यात पहिल्यांदा युतीचे सरकार आले आणि प्रथम विनायक मेटे विधान परिषद सदस्य झाले. याच काळात त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पक्ष स्थापन करुन स्वत:ची वाटचाल सुरु ठेवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com