फडणवीस, पाटलांकडून मेटेंना सत्तेच्या वाट्याचे संकेत ; ऑगस्टमध्ये मंत्रीपदाची लाॅटरी ?

मेटे यांनीही आपल्या भाषणात समाजासह आरक्षणासाठी केलेले काम, महायुतीला दिलेली साथ याचा उहापोह करत सत्तेत वाटा मिळण्याची थेट अपेक्षा बोलून दाखविली. (Beed News)
Deputy Cm Devendra Fadanvis-Vinayak Mete Beed News
Deputy Cm Devendra Fadanvis-Vinayak Mete Beed NewsSarkarnama

बीड : महायुतीमधील सर्वच घटक पक्षांना सत्तेचा वाटा भेटला. परंतु, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) मात्र मागच्या सरकारमध्ये मंत्रीपदापासून वंचित राहीले. मात्र, त्यांच्या उपेक्षेची कसर आता भरुन निघणार असल्याचे थेट संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दले आहेत. त्यामुळे विनायक मेटे यांना मंत्रीपद भेटेलच, असा विश्वास समर्थकांतून व्यक्त होत आहे. मात्र, त्यांची वर्णी परवा होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात नाही तर ऑगस्ट महिन्यात लागेल, असेही सांगीतले जात आहे.

`मी स्वत: सत्तेच्या बाहेर राहण्योच घोषीत केल्यानंतरही श्रेष्ठींनी मला उपमुख्यमंत्रीपद देऊन सरप्राईज गिफ्ट दिले`, तसेच सरप्राईज गिफ्ट विनायक मेटे यांनाही मिळेल, असे मेटेंच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात खुद्द देवेंद्र फडणवीस शनिवारी म्हणाले. (Beed) शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला.

सुरुवातीलाच डॉ. भारती लव्हेकर, भिमराव केराम व तानाजी शिंदे यांच्याकडून शिवसंग्रामची सत्तेत आतापर्यंत झालेली उपेक्षा, मराठा आरक्षणासह समाजासाठी केलेल्या कामाचा उहापोह आणि विनायक मेटे यांच्या आयुष्यातील संघर्षाचा पाढा वाचण्यात आला. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस व विनायक मेटे यांच्यातील मैत्रीचा आणि फडणवीसांचे मेटेंवरील प्रेमाचाही उहापोह करण्यात आला.

विनायक मेटे यांना कॅबीनेट मंत्री करावे, अशी थेट मागणीवजा अपेक्षा भारती लव्हेकरांसह या तिघांनीही केली. यानंतर भाजप नेते व मेटेंचे मित्र प्रविण दरेकर यांनीही याच सुरात सुर आळविला. मेटे यांनी शिवसंग्रामच्या माध्यमातून मराठा आरक्षण व समाजाच्या प्रश्नासाठी काम केल्याचे सांगीतले. त्यांनीही सर्वच सत्तेच्या मागे जातात, परंतु, विनायक मेटे यांनी फडणवीसांवर विश्वास ठेवला असेही ते म्हणाले.

त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आतापर्यंत महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसंग्रामला सत्तेचा योग्य वाटा मिळाला नसल्याची कबूली देत, सर्वांची इच्छा आहे कि मेटेंना मंत्रीपदाची अपेक्षा आहे. जसे मी सरकार येणार, सरकार येणार असे म्हणायचो तसे २०१४ मध्ये सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळणार असे म्हणायचे पण तसे झाले नाही. आता महाकठीण परिस्थितीत सरकार आले आहे. मात्र, आता कुठे पहाट झाली आहे, सूर्य चांगला उजाडू द्या, परिस्थिती स्पष्ट झाली कि त्यांची इच्छा पूर्ण होईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Deputy Cm Devendra Fadanvis-Vinayak Mete Beed News
विकासनिधीवरुन पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात जुंपली

यानंतर विनायक मेटे यांनीही आपल्या भाषणात समाजासह आरक्षणासाठी केलेले काम, महायुतीला दिलेली साथ याचा उहापोह करत सत्तेत वाटा मिळण्याची थेट अपेक्षा बोलून दाखविली. मराठा समाजाला खरा न्याय देवेंद्र फडणवीस यांनीच दिला व समाजातील उपेक्षीतांच्या त्यांच्याकडूनच अपेक्षा असल्याचेही सांगत सत्तेचा वाटा मिळाला नाही तरी आम्ही ‘मैत्री निभावणारच’असे निक्षून सांगीतले.

याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्यामुळेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या प्रकल्पाला गती आल्याचे सांगीतले. मराठा आरक्षणासह समाजाच्या कामासाठी मेटेंच्या प्रयत्नांचे कौतुक करुन ‘सरप्राईज गिफ्ट’मिळेल, असे सांगीतले. त्यामुळे वरिष्ठ भाजप नेत्यांच्या थेट संकेतामुळे आतापर्यंत सत्तेत उपेक्षीत राहीलेल्या महायुतील शिवसंग्रामला सत्तेचा वाटा विनायक मेटे यांच्या मंत्रीपदाच्या माध्यमातून भेटेल, असे शिवसंग्रामच्या समर्थकांची खात्री झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com