Beed : राजकीय द्वेषापोटीच धस - आजबेंचे एकमेकांवर आरोप..

आपली योजना मागे पडली आहे. आपण कुकडीच्या पाण्यासाठी आष्टी ते मुंबई पायी मोर्चा काढला, तत्कालिन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांना भेटल्याने ही योजना उभी राहिली. (Beed News)
Mla Dhas-Ajbe-Dhonde News Beed
Mla Dhas-Ajbe-Dhonde News BeedSarkarnama

बीड : उजनी ते खुंटेफळ योजना शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वकांक्षी योजना आहे. मात्र, राजकीय द्वेषापोटी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajbe) एकमेकांना दोष देत आहेत. त्यांच्या या राजकीय द्वेषातून या योजनेला आडकाठी येण्याची शक्यता आहे. त्या दोघांना सल्ला देण्याइतपत आपण मोठे नाहीत. आपल्या पराभवासाठी दोघे एकत्र आले होते, असा टोलाही भाजपचे माजी आमदार भिमराव धोंडे यांनी लगावला.

खुंटेफळ (ता. आष्टी) येथील जलसिंचन प्रकल्पावरुन सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे यांच्यात आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. (Beed) यात आता धोंडे यांनी उडी घेतली. रविवारी धस व आजबे यांच्या पत्रकार परिषदेतील टोलेबाजीनंतर सोमवारी धोंडे यांनीही यात उडी घेत फटकेबाजी केली. या योजनेसाठी सर्वांनी प्रयत्न करत ही योजना मार्गी कशी लागेल, याकडे लक्ष द्यावे. आपण याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून प्रयत्न करणार असल्याचेही धोंडे म्हणाले.

दोन्ही आमदारांनी पॉझिटिव्ह विचार करावा, असा सल्ला द्यायलाही भिमराव धोंडे विसरले नाहीत. आष्टी तालुक्याचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी उजनी ते खुंटेफळ योजना शेतकर्‍यांचे जिवनमान उंचावण्यासाठी महत्वाची आहे. राजकीय द्वेषापोटी सुरेश धस व बाळासाहेब आजबे यांनी एकमेकांना दोष दिल्यास ही योजना थांबून शेतकर्‍यांचे नुकसान होईल. कुकडीच्या पाण्यासाठी मी आष्टी ते मुंबई पायी मोर्चा काढला होता.

Mla Dhas-Ajbe-Dhonde News Beed
Dhas : बाळासाहेब आजबे झुरळासारखे, पेव्हर ब्लॉक बसवण्याशिवाय त्यांनी काही केले नाही..

आता सर्वांनी मिळून या याजनेसाठी प्रयत्न करण्याची गरज असून याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून आपणही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. उजनी ते खुंटेफळ कृष्णा मराठवाडा करारानुसार मराठवाड्याच्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या योजनेतील उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात कामे प्रगतीपथावर आहेत. आपली योजना मागे पडली आहे. आपण कुकडीच्या पाण्यासाठी आष्टी ते मुंबई पायी मोर्चा काढला, तत्कालिन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांना भेटल्याने ही योजना उभी राहिली.

२०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार धस यांचा धोंडे यांनी पराभव केला होता. त्यानंतर सुरेश धस लातूर - उस्मानाबाद - बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी भिमराव धोंडे यांना तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे होते. यात आजबे यांनी धोंडे यांचा पराभव केला. आपल्या पराभवाला धस यांनी हातभार लावल्याचा कायम आरोप धोंड करत असतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com