Beed : राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेला बीड जिल्हा अनेक वर्षानंतर मंत्रिपदापासून वंचित

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मासबेस ओबीसी लीडर असल्याने त्यांना संधी मिळेल अशी समर्थकांची अपेक्षा होती. (Beed News)
Political Leadaers and Minister in Beed District News
Political Leadaers and Minister in Beed District NewsSarkarnama

बीड : एच. डी. देवेगौडा यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जिल्ह्याचे भूमिपुत्र बापूसाहेब काळदाते व दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जिल्ह्याशी संबंधित प्रमोद महाजन शॅडो पंतप्रधान म्हणून ओळखले जात. मातब्बर राजकारण्यांचा जिल्हा असलेल्या (Beed) बीडला नेहमी राज्याच्या मंत्रिमंडळात देखील प्रतिनिधित्व, महत्वाची खाती मिळाली.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बीड जिल्हा अनेक वर्षांनंतर मंत्रिपदापासून उपेक्षित राहिला आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बीडला अनेकदा महत्वाची खाती मिळाली.(Marathwada) दिवंगत लोकनेते सुंदरराव सोळंके यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रथम उपमुख्यमंत्रीपद मिळाले. तर पहिल्या युती सरकारच्या काळात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे देखील उपमुख्यमंत्री होते.

त्यापूर्वीही शिवाजीराव पंडित, पंडितराव दौंड मंत्री होते. तर, युती सरकारमध्ये प्रा. सुरेश नवले, अपक्ष बदामराव पंडित पंडित यांना संधी मिळाली. जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर देखील पूर्वीच्या काँग्रेस सरकारमध्ये उपमंत्री पदापासून राष्ट्रवादीत राज्यमंत्री ते ऊर्जा मंत्रिपदापदापर्यंत पोचले. राष्ट्रवादीत दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा देखील महिला व बालविकास, आरोग्य खात्याच्या मंत्री होत्या.

प्रकाश सोळंके, सुरेश धस यांनाही राष्ट्रवादीने राज्यमंत्रिपदावर संधी दिली. मागच्या महायुती सरकारमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे महत्वाचे खाते होते. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना सहा महिन्यासाठी कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. तर, महाविकास आघाडी सरकारमध्ये धनंजय मुंडे देखील कॅबिनेट मंत्री होते. सत्तांतरानंतर जिल्ह्यात भाजपच्या माध्यमातून मंत्रिपद मिळेल असा अंदाज होता.

Political Leadaers and Minister in Beed District News
Aurangabad साठी मोठा दिवस : तीन कॅबिनेट मंत्री आणि दानवेंनाही कॅबिनेट दर्जा!

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मासबेस ओबीसी लीडर असल्याने त्यांना संधी मिळेल अशी समर्थकांची अपेक्षा होती. तर, विधान परिषद सदस्य सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार व नमिता मुंदडा देखील जिल्ह्यात भाजप आमदार आहेत. त्यापैकी देखील कोणाला तरी संधी मिळेल असा अंदाज होता. तर, महायुती मधील घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे मागच्या महायुती सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित होते.

त्यामुळे यावेळी तरी त्यांना संधी मिळावि अशी खुद्द मेटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. मागच्या महिन्यात मेटे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानी उंचावलेली अपेक्षा देखील मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात फोल ठरली. आता संभाव्य विस्तारात तरी संधी मिळेल हि अपेक्षा जिल्ह्यातील नेते बाळगून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com