Beed : धनंजय मुंडेंचा मोठेपणा, पंकजांचे मानले आभार; सत्तार-मेटेंचीही टोलेबाजी..

जिल्ह्याचा मागासलेपणा दूर व्हावा यासाठी बीड जिल्ह्यात व्यापक विकासकामे व्हावीत म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी एका व्यासपीठावर यावे. (Dhnanjay Munde)
Dhnanjay Munde-Pankaja Munde
Dhnanjay Munde-Pankaja MundeSarkarnama

बीड : जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे भावंडांच्या कायम एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. मात्र, शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांनी भर व्यासपीठावरुन माजी पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे आभार मानले. थेट नाव घेतले नसले तरी पंकजा मुंडेंच्या योगदानाचा विसर त्यांनी पडू दिला नाही हे आणि योगदानाबद्दल श्रेय देण्याचा मनाचा मोठेपणाही दाखवला हे विशेष. (Beed) याच कार्यक्रमात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनीही टोलेबाजी केली. निमित्त होते जिल्हा परिषदेच्या भव्य प्रशासकीय इमारतीच्या उभारणीनंतर लोकार्पणाचे.

या इमारतीच्या उभारणीमध्ये अनेकांचे योगदान आहे. माजी पालकमंत्री व माजी ग्रामविकास मंत्री यांचे योगदानही विसरता येणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले. जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व इमारत परिसरातील शंभूराजेंसह इतर राष्ट्रपुरुष आणि लोकनेत्यांच्या पुतळ्यांचे भूमिपुजन शनिवारी झाले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला.

तर पालकमंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, संजय दौंड, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची चांगलीच शाब्दिक टोलेबाजी रंगली.

जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यकाळ संपत आला असल्याने पुढे भविष्यात काहीजण पुन्हा सदस्य होतील तर काहीजण त्यावरच्या सभागृहात देखील जातील असे म्हणत धनंजय मुंडे यांनी "जे होते ते भल्यासाठीच" या गोष्टीची आठवण करून दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेससह भारतीय जनता पक्षाचे आमदार विनायक मेटे हे देखील व्यासपीठावर आहेत, जिल्ह्याचा मागासलेपणा दूर व्हावा यासाठी बीड जिल्ह्यात व्यापक विकासकामे व्हावीत म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी एका व्यासपीठावर यावे, त्यातून जिल्ह्यात सकारात्मक कामे होतील, असेही मुंडे म्हणाले.

Dhnanjay Munde-Pankaja Munde
Imtiaz jalil : सत्तार चालतात, मग मी का नको ? मंदिरांना मी पण निधी देतो..

विनायक मेटे यांनीही बीडच्या खासदारांनी नगर - बीड - परळी रेल्वे मार्ग गतीने पूर्ण व्हावा, यासाठी केंद्रातल्या सरकारकडे पाठपुरावा करावा. भाषणात उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आमची नावे कोनशिलेवर आल्याचे समाधान असल्याचे म्हणाल्याचा धागा पकडून ‘चांगले कामे करत रहा, भविष्यात तुमचाही पुतळा उभारला जाईल’,असे म्हणताच एकच खसखस पिकली. विशेष म्हणजे चार सदस्य सोडून गेलेल्या (मेटेंच्या शिवसंग्रामकडून विजयी झालेले चौघे नंतर भाजपमधये गेले) सगळ्यांनाच पुन्हा विजयाच्या शुभेच्छा, असा चिमटाही मेटेंनी काढला.

फडणवीसांनीच सांगितले म्हणून सेनेत..

देवेंद्र फडणवीसांच्या सल्ल्यानेच आपण शिवसेनेत गेलो. मी पुन्हा येईन असं म्हणनार नाही, कर्तबगार लोक निवडून येतातच, असं अब्दुल सत्तार म्हणाले. शिवसेनेत जाता जाता मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मी भाजपमध्ये जाणार होतो, मात्र शिवसेनेत आलो. सत्तार नावातील र काढल्यास सत्ता होईल. कधी कधी राजकारणात मॅच फिक्सिंग करावी लागते. धनंजय मुंडे टायगर आहेत, निवडणूकीत पराभूत होऊन देखील ते टायगर राहिले. धनंजय मुंडे यांनी मला खूप मदत केली. घोडा कुठलाही असला तरी लगाम मुंडेंचीच असते, असंही सत्तार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com