Beed : बनावट प्रमाणपत्र कारवाईला स्थगिती देणाऱ्या आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी..

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले. दोषींवर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणीही आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली. (Beed News)
Protest Against Health Minister In Beed News
Protest Against Health Minister In Beed NewsSarkarnama

बीड : राज्यात सत्तांतराच्या काळापासून `पन्नास खोके अन॒ एकदम ओक्के` असा नवा वाक्यप्रचारच प्रचलित झाला आहे. Health Department महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर वरिल शेरा कायम मारला जात असताना आता सामाजिक कार्यकर्त्यांनीही सत्ताधाऱ्यांवर याच वाक्याचा मारा सुरु केला आहे. Beed

Protest Against Health Minister In Beed News
Imtiaz Jalil : तर भाजपने यापुढे शिवाजी महाराजांचे फोटो, पुतळे आपल्या कार्यक्रमात ठेवू नयेत..

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात `पन्नास खोके अन् एकदम ओक्के` म्हणत आंदोलन करण्यात आले. (Tanaji Sawant) विशेष म्हणजे आंदोलनस्थळी खोके मांडून हातात दोन हजार, पाचशे रुपयांच्या खेळण्यातल्या नोटा हाती घेऊन आंदोलकांनी घोषणाबाजी केली. (Marathwada)

येथील जिल्हा हिवताप कार्यालयातून हंगामी फवारणी कर्मचारी असल्याचे बनावट प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीनंतर प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोषी आढळून आल्याने फौजदारी गुन्हे नोंद करण्याची शिफारस समितीने केली. या प्रकरणी प्रमाणपत्र घेणाऱ्या ६९ जणांच्या विरोधात गुन्हेही नोंद करण्यात आले. मात्र, प्रमाणपत्र देणाऱ्यांवरील कारवाईला आमदार संतोष बांगर यांच्या पत्रावरुन खुद्द आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी स्थगिती दिली.

तत्कालीन जिल्हा हिवताप आधिकारी डॉ.के. एस. आंधळे, कीटक संमाहारक जीवन सानप व वरिष्ठ लिपिक के. के. सातपुते या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तानाजी सावंत पाठीशी घालत असल्याचा आरोप करुन त्यांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले.

दोषींवर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणीही आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली. तसेच, उपसंचालक, सहसंचालक, जिल्हाशल्यचिकित्सक संवर्गातील बदल्यांच्या स्थागितीचे गौडबंगाल काय, एकिकडे बदल्यांचे आदेश निर्गमित केल्यानंतर लागलीच स्थगिती व पुन्हा त्यांच्याच कार्यालयातून संबंधीत उपसंचालकांना मुव्हमेंट ऑर्डर काढायला लावण्यामागे इंगीत काय, अशी विचारणा करत या प्रकरणाची चौकशीची मागणी आंदोलकांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com