Beed : धोकादायक वर्ग खोल्या, उघड्यावर शाळा ; पालकमंत्री मुंडे फक्त गाजर दाखवतात

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ प्रसिद्धी माध्यमातून विकासाचे गाजर दाखवत आहेत. (Beed)
Beed Protest with carrot News
Beed Protest with carrot NewsSarkarnama

बीड : बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. (Beed) प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना गाजर दाखवून हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या आंदोलनाची दिवसभर चर्चा रंगली होती.

जिल्ह्यातील २६४ शाळांमधील ६४० वर्गखोल्या धोकादायक आहेत. तर अनेक शाळा उघड्यावर असून ४३७ शाळांमध्ये मुलींना तर २७५ शाळांमध्ये मुलांना स्वच्छतागृह नाही. (Marathwada) त्यामुळे या शाळांमध्ये तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी करत हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ प्रसिद्धी माध्यमातून विकासाचे गाजर दाखवत आहेत. जिल्ह्यातील या शाळांच्या दुरवस्थेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागले आहेत.

असे असतांना प्रशासन मात्र जागचे हलायला तयार नाही. याचाच निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान यावेळी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Beed Protest with carrot News
Osmanabad : सावंतांनी भाजप सोडून सत्तेतील मित्रपक्षांनाच धुतले ; शिवसैनिक नाराज

आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे व जिल्हा परिषदेच्या सीईओंवर टीका करतांना ते फक्त गाजर दाखवत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करून ते तातडीने सोडवले नाहीत, तर नेत्यांना गाजर दाखवू, असा इशारा आंदोलनकर्ते गणेश ढवळे यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com