Beed : आपल्या विरोधात षडयंत्र ; पण पोलिसांना सहकार्य करणार..

लोकसेवका विरोधात तक्रार आली तर त्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते. पण तशी परवानगी अद्याप घेतली गेली नाही. (Mla Suresh Dhas)
Mla Suresh Dhas News, Beed
Mla Suresh Dhas News, BeedSarkarnama

बीड : देवस्थानची कुठलीच इनामी जमीन माझ्या किंवा कुटुंबाच्या नावावर नसुन हे षडयंत्र आहे. आपल्यावर दाखल गुन्ह्यात पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितले. Beed राम खाडे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेल्या तक्रारीवरुन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या High Court आदेशाने धस यांच्यासह नातेवाईक व इतरांवर येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

Mla Suresh Dhas News, Beed
Marathwada : शिवसेनेचा खासदार पाडणाऱ्या जाधवांना आमदार, खासदार होण्याची इच्छा नाही..

गुरुवारी (ता. एक) धस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. निराधार तक्रारातील वाक्य रचनेमुळे गुन्हे दाखल झाले आहेत. नाव न घेता सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले, आपल्या जुन्या पक्षातील (राष्ट्रवादी) राज्य व जिल्हास्तरावरील लोकांचे हे राजकीय षडयंत्र आहे. पोलिसांच्या चौकशीला मी तयार असुन चौकशीत सहकार्य करणार आहे. (Marathwada) लवकरच दुध का दुध व पाणी का पाणी होईल, असा विश्वास आहे.

लोकसेवका विरोधात तक्रार आली तर त्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते. पण तशी परवानगी अद्याप घेतली गेली नाही. जर असं घडत असेल तर कोणत्याही लोकसेवकावर असे अस्त्र वापरले जाईल, असेही धस म्हणाले. बीड जिल्ह्यात प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला होता.

वक्फच्या प्रकरणात गुन्हे दाखल असून, हिंदू देवस्थानच्या प्रकरणात मात्र गुन्हे दाखल झाले नाहीत असा मुद्दा त्यांनी याचिकेत उपस्थितीत केला होता. पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील खाडे यांनी केली होती. मात्र गुन्हे दाखल न झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने खाडे यांची तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरत फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश दिले होते. या आदेशा विरोधात धस सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश कायम ठेवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com