Beed : मते मिळविण्यासाठीच मुंडेंचा भाजपकडून वापर; शिवसेनेच्या मुळूक यांचा आरोप

बहुजन समाजातील नेतृत्वाला संधी मिळु नये यासाठी देवेंद्र फडणवीस व संघीय मंडळीने जाणीवपुर्वक रचलेले षडयंत्र असल्याचा आरोपही मुळूक यांनी केला आहे. (Shivsena)
Beed : मते मिळविण्यासाठीच मुंडेंचा भाजपकडून वापर; शिवसेनेच्या मुळूक यांचा आरोप
Bjp Leader Pankaja Munde-Shivsena Ex.District Chief MulukSarkarnama

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने विधान परिषदेची उमेदवारी टाळली आहे. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे. (Beed) आता त्यांच्याबद्दल शिवसेनेनेही (Shivsena) सहानुभूती दाखवत भाजपवर आरोप केले आहेत. भाजपकडून फक्त मतांसाठी मुंडे नावाचा वापर केला जात असल्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी म्हटले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकांतील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमधील प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून त्यांना यावेळी विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एकदा त्यांचे नाव टळले आहे.

यापूर्वीही राज्यसभा आणि विधान परिषदेत पंकजा मुंडे यांना टाळल्याने समर्थकांमधून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल नाराजी आणि संताप आहे. आता यात अधिकच भर पडली असून सोशल मिडीयावर तशा प्रतिक्रीया उमटत आहेत. आता त्यांच्या समर्थनाथ शिवसेनाही उतरल्याचे चित्र आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी याबाबत प्रतिक्रीया देताना भाजपवर आरोपही केले आहेत. बहुजन समाजाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा वापर भाजपने महाराष्ट्रात सत्तेवर येण्यासाठी केला. त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना तिसऱ्यांदा जाणीवपुर्वक विधान परिषदेची उमेदवारी नाकारुन अपमानित केले.

Bjp Leader Pankaja Munde-Shivsena Ex.District Chief Muluk
पंकजा मुंडेंना डावलताच कार्यकर्ते आक्रमक! थेट भाजप कार्यालयावर धडकले

बहुजन समाजातील नेतृत्वाला संधी मिळु नये यासाठी देवेंद्र फडणवीस व संघीय मंडळीने जाणीवपुर्वक रचलेले षडयंत्र असल्याचा आरोपही मुळूक यांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार व वंजारी समाजासहीत बहुजन समाजात मोठी नाराजी पसरली असल्याचे ते म्हणाले.

भाजपला मते मिळावीत म्हणून फक्त मुंडे नावाचा वापर होतोय का ? असा सवाल करत याचा विचार आता भाजपला मतदान करणाऱ्या बहुजन समाजासहीत वंजारी समाजाने करावा असे आवाहन मुळूक यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in