Beed : समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी निलंबित

कारवाई होत नसल्याने नसल्यामुळे वंचितचे अजय सरवदे यांनी आंदोलन, पत्रव्यवहारासह न्यायालयातही धाव घेतली हेाती. (Beed News)
Assistant Commissioner in  Dr. Sachin Madavi suspended
Assistant Commissioner in Dr. Sachin Madavi suspendedSarkarnama

बीड : येथील सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांचे सेवेतून निलंबन करण्यात आले. (Beed) शासनाचे सचिव दि. रा. डिंगळे यांनी शुक्रवारी (ता. १०) याबाबत आदेश दिले. २०१७ मध्ये जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध निधीतील खरेदीतील अनियमितते प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

जिल्हा नियोजन समितीमधून २०१७ मध्ये विशेष घटक योजनेतील निधीतून लाभार्थींसाठी साहित्य खरेदीतीत अनियमितता झाली होती. (Marathwada) निधी उचलूनही खरेदी केली नसल्याचा ठपका त्यांच्यावर चौकशीत ठेवण्यात आला. काही काळ ही रक्कम याच विभागात होती. (Maharashtra)

चौकशी समितीच्या शिफारसीनुसार आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना १८ नोव्हेंबर २०२० मध्ये त्वरित निलंबित करून एकत्रित विभागीय चौकशी करण्याची शिफारस केली होती. मात्र, कारवाई होत नसल्याने नसल्यामुळे वंचितचे अजय सरवदे यांनी आंदोलन, पत्रव्यवहारासह न्यायालयातही धाव घेतली हेाती.

Assistant Commissioner in  Dr. Sachin Madavi suspended
राष्ट्रवादी, काॅंग्रेसने जोखीम पत्करायला हवी होती ; सगळं खापर अपक्षांच्या माथी नको..

दरम्यान, शुक्रवारी अखेर डॉ. सचिन मडावी यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. सचिन मडावी पाच वर्षांपासून जिल्ह्यातच कार्यरत आहेत. निलंबन काळात त्यांना जिल्हा जातपडाळणी कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com