Beed APMC News : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गड राखले ; भाजपमध्ये केवळ धस, आडसकरांनाच जमले..

Ncp : बीड बाजार समिती निवडणुकीत विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत सत्तांतर घडविण्याची किमया केली.
Beed APMC News
Beed APMC NewsSarkarnama

Marathwada : जिल्हा परिषद, नगर पालिका, बाजार समित्या (Beed APMC News) आदी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था लोकसभा व विधानसभा निवडणूकांसाठी राजकीय पायाभरणी मानली जाते. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांनी आपापल्या मतदार संघातील बाजार समित्यांचे गड राखण्यात यश मिळविले. भाजपमध्ये केवळ आमदार सुरेश धस व रमेशराव आडसकर यांनाच बाजार समित्यांच्या निवडणुका जिंकता आल्या.

Beed APMC News
Nanded District APMC News : दोन खासदार, एक आमदार तरी, अशोक चव्हाण युतीला ठरले भारी...

जिल्ह्यातील सर्व सहाही विधानसभा मतदार संघातील नऊ बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आपल्या माजलगाव मतदार संघातील माजलगाव व वडवणी बाजार समिती निवडणुक जिंकण्यात यश मिळविले. (Ncp) यापूर्वी वडवणी बाजार समितीची सत्ता भाजपकडे होती. मात्र, भाजपचे माजी आमदार केशव आंधळे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीसोबत आहेत.

त्यांच्या मदतीने येथे आमदार सोळंके यांनी एकतर्फी सत्तांतर घडवून आणले. परळी मतदार संघातील परळी बाजार समिती निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने एकतर्फी विजय मिळविला. याच मतदार संघाचा काही भाग अंबाजोगाई तालुक्यात आहे. यापूर्वी सदर बाजार समितीवर भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांचे वर्चस्व होते. या ठिकाणीही राष्ट्रवादीने सत्ता मिळविली.

या ठिकाणी आमदार मुंडेंच्या मदतीने माजी आमदार संजय दौंड, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण आदींनी धुरा सांभाळली. इकडे गेवराई मतदार संघातील गेवराई बाजार समितीची सत्ता पुन्हा एकदा मोठ्या फरकाने राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी राखली. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधात एकत्र आलेल्या भाजप आमदार लक्ष्मण पवार व शिवसेनेचे (उबाठा) माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बीड बाजार समिती निवडणुकीत विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत सत्तांतर घडविण्याची किमया केली. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव झाला. या ठिकाणी सर्वाधिक संचालक राष्ट्रवादी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे विजयी झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेत्यांच्या विजयाचा वारु उधळत असताना भाजपमध्ये केवळ आमदार सुरेश धस व भाजपचे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांना आपल्या बाजार समित्यांमध्ये सत्ता मिळविण्यात यश आले आहे

Beed APMC News
Chhatrapati Sambhajinagar APMC News : वज्रमुठ सुटली, शिंदेंच्या शिलेदारांनी गड राखले..

सुरुवातीलाच कडा (ता. आष्टी) बाजार समिती बिनविरोध काढण्यात यश मिळविलेल्या सुरेश धस यांनी शेवटच्या टप्प्यात पाटोदा बाजार समितीच्या निवडणुकीतही बाजी मारली. तर, केजमध्ये मागील ५० वर्षांपासूनची सत्ता अबाधित ठेवण्यात भाजपचे रमेश आडसकर पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत. त्यांना आमदार नमिता मुंदडा गटानेही मदत केली.

जिल्ह्यातील नऊ पैकी पाच बाजार समित्या राष्ट्रवादी प्रणित आघाडीने जिंकल्या. तर, एक बाजार समिती विविध पक्षांच्या परिवर्तन महाआघाडीने जिंकली. तर, भाजपने कडा, पाटोदा व केज बाजार समिती जिंकून या यादीत आपले स्थान ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांमध्ये पगडा आहे. मात्र, या पंगतील भाजमध्ये सुरेश धस व रमेश आडसकर देखील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com