Beed : कार्यालयात घुसून नायब तहसीलदारावर भावाकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला

आरडाओरड आणि गोंधळ ऐकून महसुल कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर भावाला एका खोलीमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. (Crime)
Beed : कार्यालयात घुसून नायब तहसीलदारावर भावाकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला
Beed Latest Marathi News, Kej News, Beed Crime NewsSarkarnama

केज : सख्ख्या भावाने आपल्या नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवार (ता.०६) रोजी दुपारी बाराच्या सुमारास केज तहसील कार्यालयातील आस्थापना विभागात घडली. (Beed) या घटनेने एकच खळबळ उडाली असून इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. (Marathwada)

या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला नायब तहसीलदाराचे नाव आशा वाघ असल्याचे समजते. शहरातील तहसील कार्यालयात मागील काही वर्षांपासून आशा वाघ या नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. (Crime) त्या नित्याप्रमाणे तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेत सेवा बजावत असताना रविवारी दुपारी त्यांचा सख्ख्या भावाने अचानक येऊन गोंधळ घातला.

यावेळी वाद वाढल्यानंतर त्याने धारदार कोयत्याने बहिणीवरच हल्ला केला. या घटनेने तहसील कार्यालयात गोंधळ उडाला, आरडाओरड आणि गोंधळ ऐकून महसुल कर्मचाऱ्यांनी हल्लेखोर भावाला एका खोलीमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

Beed Latest Marathi News, Kej News, Beed Crime News
Aurangabad : `स्वाभीमान` सभेआधीच मुख्यमंत्र्यांवर भाजप, एमआयएमकडून प्रश्नांचा पाऊस..

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखाराला ताब्यात घेतले. दरम्यान, जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा हल्ला संपत्तीच्या वादातून घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in