Bazar Samiti Result : आमदार बांगराच्या कळमनुरीत महाविकास आघाडीचा डंका; १२ जागा जिंकत सत्ता खेचली!

Kalamnuri Bazar Samiti Result : महाविकास आघाडीला वंचितचे बळ, बांगरांचा करेक्ट कार्यक्रम..
Bazar Samiti Result : MLA Santosh Bangar
Bazar Samiti Result : MLA Santosh BangarSarkarnama

Kalamnuri Bazar Samiti Result : कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत शेतकरी महाविकास पॅनलला १२ जागा मिळाल्या. शिवसेना-भाजप युतीच्या जय भवानी शेतकरी विकास पॅनलला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले. हा सत्ताधारी पक्षाला पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. मात्र या ठिकाणी त्यांना सपशेल पराभव स्वीकारावा लागला.

Bazar Samiti Result : MLA Santosh Bangar
Khanapur Bazar Commitee Results : खानापुरात काँग्रेस-शिवसेनेने भाजपाच्या साथीनं राष्ट्रवादीला धूळ चारली !

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत १७ संचालक पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व शिवसेना-भाजप युतीच्या जय भवानी शेतकरी विकास पॅनलमध्ये समोरासमोर लढत झाली. अतिशय चुरस व प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत दोन्ही बाजूकडून मतदान करून घेण्याकरिता प्राधान्य देण्यात आले होते.

बाजार समितीच्या ८११ मतदारांपैकी ७८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ९७.२९ इतकी आहे. सकाळी आठ ते चार या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता दोन टेबल वरून निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली.

Bazar Samiti Result : MLA Santosh Bangar
Paithan APMC Election : पैठण बाजार समितीवर मंत्री भुमरेंची सत्ता कायम राहाणार का ?

यावेळी तहसीलदार सुरेखा नांदे यांची उपस्थिती होती. निकालामध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी महाविकास आघाडीच्या पॅनलमधील सहकारी संस्था मतदारसंघातील सर्वच्या सर्व ११ उमेदवार विजयी झाले.

Bazar Samiti Result : MLA Santosh Bangar
Shegaon Bazar Samiti Result : आमदार संजय कुटेंना काँग्रेसचा धक्का; शेगावात भाजपचा सुपडा साफ

विजयी उमेदवार -

नागोराव करंडे १९७, बबनराव काशीद १७७, गणेश जाधव १८९, नितीन जिंतूरकर १९८, राजू बेद्रे १९५, साहेबराव बेदरे १८८, कांतराव शिंदे १९८, सहकारी संस्था महिला राखीव गंगाबाई मस्के १९८, कांचनबाई सुकळकर १९१, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय गटामधून प्रकाश गिराम २०६, मारोतराव खांडेकर १९६, तर व्यापारी गटामधून शेख महबूब शेख बाबा २९ मते घेऊन विजयी झाले. ग्रामपंचायत मतदार संघातून शिवसेना-भाजप युतीचे ग्रामपंचायत मतदार संघामधून सुरेश नागरे १५३, प्रसाद शिंदे १५९, दौलत धनवे १७८, रुस्तुम दांडेकर १७१ व व्यापारी गटामधून बंडूअप्पा पंचलिंगे ३० हे पाच उमेदवार विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com